Skip to main content

मृत्यु

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 13/06/2009 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला मृत्युचि खुप भिति वाटते..तो अटळ आहे हे मला समजते.. मृत्युचे विचार मनात आले कि मी अर्धमेला होतो....माझी भिति कशी घालवु?

डीलीव्हरी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 13/06/2009 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला एकच प्रश्न पडतो आहे. एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात? नेमका काय त्रास असतो.? दररोज एक चालेल हो. पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे? तुम्हाला काय वाटते? जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?

गंमतशाळा आणि बालसाहित्य

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 13/06/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीशब्दच्या उपक्रमामुळे शिक्षणक्षेत्रातील काही व्यक्तिशी संपर्क आला व त्याचर्चेतून असे वाटायला लागले की - मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी एखाद्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण करावी.

तुम्ही... हो तुम्हीच.

लेखक स्व यांनी शनिवार, 13/06/2009 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी प्रेम केलय का? तुम्हाला प्रियकर्/प्रेयसी आहे किंवा होता/होती का? हे करायलाच हवं का? कुणी काही विचारलं तर होकार द्यायलाच हवा का? होकार दिल्यास विवाहाचं बंधन "मस्ट" आहे का? विवाहाशिवायही खर खुरं , जेन्युइन नातं असु शकता का? प्रेम विवाह न केल्यास आयुष्यं म्हणजे वैराण आहे का? आपल्यासाठी अमुकच एक जण अगदी अचुक, अनुरुप आहे हे ओळखायचा काही राजमार्ग कुणाला माहित आहे का? आज आवडलेली व्यक्ती जन्मभर अशीच आवडु शकते का?

पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 13/06/2009 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात? (This article was published in eSakal's web edition http://beta.esakal.com/2009/06/05114456/international-Pakistans-cond.ht… or http://tinyurl.com/kjldqp) आज पाकिस्तानात जे अराजक माजले आहे त्याची मूलभूत कारणे शोधली तर एक गोष्ट सहज दिसते की पाकिस्तानने स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे स्वत: कधीच कमावले नाहीत.

मी काय म्हणतोय....

लेखक मन यांनी शनिवार, 13/06/2009 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
And then they say "Gravity is not needed to fall in love!!" So true.So beautiful. माणुस प्रेमात "पडतो" हे वाक्यच मुळी पिक्चर "पडला",गड "पडला" , सर्कशीतला सायकलस्वार धड"पडला" आणि मग एकदाचा खाली "पडला" या वाक्यांच्या लायनीवर वाटतं.पण तरीही असं "पडणं" कुणालाही हवहवसं, निदान एकदा तरी पडुन पहावं असं वाटायला लावणारं आहे. प्रख्रोग "हृदयरोग" तज्ञ डॉ मुन्नभाइ MBBS ह्यांनी सांगिअतल्या प्रमाणे कुठल्याही औषधाला जोड हवी "जादु की झप्पी" मिळायची. औषधी जगायला शक्ती देते. "जादु की झप्पी" औषधं घ्यायला उद्युक्त करते!! तस्मात् माणसानं "जादु की झप्पी" या अनुभवातुन जावच.

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त द्रुष्टिकोनातून

लेखक नानबा यांनी शनिवार, 13/06/2009 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात. अशाच काही पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे नामांकित अर्थ तज्ज्ञ, २००४ ते २००९ या काळात भारताचे अर्थ मन्त्री राहिलेले आणि सध्याच्या युपिए सरकारमध्ये ग्रुहमन्त्री असणार्‍या पी. चिदंबरम यांच "अलिप्त द्रुष्टिकोनातून" हे पुस्तक. पुस्तकाच्या मुखप्रुश्ठावर पी. चिदंबरम यांचं अतिशय प्रसन्न हसरं चित्र आहे. आणि "चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाटीच चांगली कामगिरी करणारे असते" ही टॅग लाईन आहे. चिदंबरम यांनी एन्.डी.ए.

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/06/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे?

Kale's Law

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 12/06/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
Kale's Law Simply put, Kale's Law (which is based on extensive and in-depth research covering current situation, modern history and sound reasoning) brings out how the world has always been ruled by the clean-shaven. Due to the very nature of the subject, the study does not include the pre-razor era when the people simply did not shave because the shaving was rather painful and people preferred to be grizzly than be in tears.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 12/06/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.