चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
२०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.
मिसळपाव