आणि बांध फुटला
ज्या घरात पालक आणि मुले ह्यांच्यात अभ्यासावरुन भांडणे असतात त्यांना मी एक प्रश्न न चुकता विचारतो.
" काहो, मुलाला जवळ बसवुन पाठीवरुन किंवा डोक्यावरुन हात फिरवल्याला किती दिवस झाले"?
बहुतेकांच्या चेहेर्यावर 'कुठल्या येड्चापाच्या नादाला लागलो 'असे भाव असतात.
___________________________________________________________
चिरंजीव माझी कुठलीही मदत न घेता आपणच मिळवलेल्या नोकरीवर जाण्याचा पहीला दिवस. बुट घातले आणि दरवाजा उघडणार इतक्यात मी त्याला हाक मारली, "बेबी"( मला मुलगी नाही, आणि आहे ती खुप लांब असते). तो वळला, आणि माझ्या ओठाचा चंबू बघुन परत फिरला. हसत हसत गालाचा एक छान पापा दिला.
मिसळपाव
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.
बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.
अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.