"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"
"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"
शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.
शबनम..!
मुंबैच्या कॉग्रेस हाऊस मधली एक मुजरेवाली, एक डान्सर. १९९०-९१ च्या सुमारास मी फोरास रोडवरच्या बारमध्ये जो नौकरीला लागलो त्या नौकरीतून एकाच्या ओळखीने दुसरा, दुसर्याच्या ओळखीने कुणी तिसरी या पद्धतीने त्या विभागातले स्त्रीपुरुष माझ्या संपर्कात आले, आजही येत आहेत.