बनाना-नट ब्रेड ( केळ्याचा केक )
केळी जास्त पिकलेली असली कि खाविशी वाटत नाहित. अश्यावेळी उरलेल्या केळ्यांचा हा झटपट होणारा बनाना नट ब्रेड अतिशय चविष्ट होतो.
साहित्य : ४ पिकलेली केळी,
१/२ कप वितळवलेल बटर,
१ १/२ कप मैदा ,
२ फेटलेली अंडी,
३/४ कप बारीक वाटलेली साखर,
१ टिस्पुन बेकिंग सोडा,
१ टिस्पुन वनिला,
१ चिमुट मीठ
१/४ कप बरीक कापलेले अक्रोड,
मुठभर मनुका
केळी कुस्करुन घ्यावीत. एका भांड्यात केळी आणि बटर मिसळावे. त्यात फेटलेली अंडी, वनिला घालुन एकत्र करावे.
मिसळपाव