Skip to main content

बनाना-नट ब्रेड ( केळ्याचा केक )

लेखक लवंगी यांनी शनिवार, 18/07/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
केळी जास्त पिकलेली असली कि खाविशी वाटत नाहित. अश्यावेळी उरलेल्या केळ्यांचा हा झटपट होणारा बनाना नट ब्रेड अतिशय चविष्ट होतो. साहित्य : ४ पिकलेली केळी, १/२ कप वितळवलेल बटर, १ १/२ कप मैदा , २ फेटलेली अंडी, ३/४ कप बारीक वाटलेली साखर, १ टिस्पुन बेकिंग सोडा, १ टिस्पुन वनिला, १ चिमुट मीठ १/४ कप बरीक कापलेले अक्रोड, मुठभर मनुका केळी कुस्करुन घ्यावीत. एका भांड्यात केळी आणि बटर मिसळावे. त्यात फेटलेली अंडी, वनिला घालुन एकत्र करावे. नंतर मीठ, साखर, बेकिंग पावडर सगळे घालून १ मिनिट फेटावे. त्यात मैदा घालावा. चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात अक्रोड आणि मनुका घालाव्यात. अवन ३५० फारनहाईट वर गरम करुन घ्यावा. बेक करायच्या भांड्याला बटर लावुन त्यात वरील मिश्रण ओतावे. १ तास बेक करावे. गरमागरम बनाना-नट ब्रेड तयार.

वाचने 5400
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त! :) तात्या.

लवंगीताई, तू ग्रेट आहेस! किती दिवसांपासून ह्या पाकृच्या शोधात होते. माझ्याकडच्या प्रमाणानुसार (जे वर दिल्यापेक्षा खूप वेगळे आहे) ह ब्रेड कधीही नीट जमला नाही व बाहेरून विकत आणत असे. आता मात्र हवा तसा ब्रेड जमेल अशी आशा आहे. धन्यवाद! रेवती

In reply to by रेवती

मीपण २-३ प्रकारे करुन पाहिला. पण या प्रमाणाने मस्त होतो. यात मैद्याऐवजी ऑल पर्पज वापरुनपण छान होतो.

च दिसतोय केक.... दिपाली :)

व्वा.असा केक बनावला जाऊ शकतो याचा कधी विचारच केला नव्हता !!! :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

केक छान आहे. :) पण अंड्याशिवाय केक चांगला होऊ शकेल का? :? "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

मस्तच दिसतो आहे बनाना केक.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मस्तच दिसतो आहे बनाना केक..
+१ --शाल्मली.

मस्त दिसतोय ब्रेड. मी वेगळ्या पद्धतीने करते. आता असा करुन बघेन.