Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक पोलिसकाका_जयहिन्द यांनी रविवार, 26/07/2009 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला कोणाच्याही guestbook मध्ये लिहीता येत नाही. "You are not allowed to post in this guestbook." ही सुचना येते. कोणी उपाय सुचवेल का? धन्यवाद......

फिरस्ता

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 26/07/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी सकाळची वेळ, अंदाजे साडेपाच ते पावणेसहा. मला जाग आलेली होती, पण अंथरुणात लोळत, परत एकदा अनावश्यक सुलतानी झोपेच्या प्रतिक्षेत होतो. तेवढ्यात कानावर खड्या, खणखणीत आवाजात घराच्या बाहेरून एक लकेर ऐकू आली. अबीर गुलाल उधळीत रंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग भजन ओळखीचे होते, पण लावलेली चाल ओळखीची नव्हती आणि भजनाला दिमडीचा ठेका धरलेला होता. मी बिछान्यातून ताडकन उठून कोण गातंय, बघायला बाहेर आलो तर शेजारच्या सोसायटीच्यासमोर एक नाथपंथी जोगी भजन म्हणंत उभा होता.

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

४६१-२७-४

लेखक विकास यांनी रविवार, 26/07/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या शिर्षकावरून गोंधळायला झाले असेल तर उत्तर सोपे आहे: २६ नोव्हेंबरच्या हल्ल्या नंतर सरकारीपातळीवर किती तडकाफडकी हालचाली होवून दहशात विरोधी यंत्रणेत सुधारणा झाल्या आहेत हे उच्च न्यायालयापुढील जनहीतयाचिकेला दिलेल्या अधिकृत उत्तरामुळे बाहेर आले. (सकाळ अग्रलेख) आजच आठ महीने पुर्ण होत असलेल्या या घटनेनंतर सरकारने सांगितल्याप्रमाणे एकूण दहशतवादीविरोधी पथकात अधिकारी ४६१, बुलेटप्रुफ जॅकेट्स - २७ आणि हेल्मेट्स - ४. कारण? मा.