Skip to main content

अजुन एक विडंबन

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 29/07/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो धुंद पाऊस, मनात आली दारु पिण्याची हाउस, म्हणतेस तु एकटा नको जाऊस, मला घेउन जा भाव नको खाउस तुझ ते हळुवार ऑर्डर देण आणि नंतर बिलाकडे टक लावुन बघण आणि हळुच इशारा करण आणि माझ रागाने लालबुंद होण झालय नेहमीचच गाह्राण नेहमीच असे करतेस पी-पी पितेस आणि मलाच बिल द्यायला लावतेस झालय आता नेहमीचच मला परत कधीच नाय नेणार तुला कधी कळणार तुला , एकदा तरी बिल द्याव मला ?
काव्यरस

अर्थ/अनर्थ

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 29/07/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही म्हणी अथवा वाक्प्रचारांमधले वापरल्या जात असणार्या शब्दांबद्दल मला फार दिवसांपासुन प्रश्न पडलेले होते.विजुभाऊंच्या धाग्यापासुन प्रेरणा घेवुन हे प्रश्न विचारत आहेत. (कृपया त्या धाग्याचे हे विडंबन आहे असे कोणी समजु नये.) १.हातावर तुरी देवुन निसटणे ह्या वाक्र्पचारातील तुरीचे प्रयोजन काय? २.तोंडात मूग गिळुन गप्प बसणे... मूगाचा आणि गप्प बसण्याचा संबंध काय? ३.कानामागुन आली आणि तिखट झाली... कोण कानामागुन आले आणि तिखट झाले.?. ४.दत्त म्हणुन हजर होणे ... ह्यामागे काय कथा आहे? ५.लंकेची पार्वती..

उसाश्यांचे भान

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/07/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तरवारीना मिळते कवितेचे म्यान जीवघेणी तान होते कट्यारीचे पान हरपते सारेच ऐकूनी देहभान हवे कशास मग उसाश्यांचे भान... तू सभोताली नीळाई होउनी येतेस सारे आकाश झाकुनी ऐन पावसात इंद्रधनु घेउनी हवे कशास मग उसाश्यांचे भान होवोनी चंद्र मन धुंद होत जाते पायीचे नाद ताल संगीत होते काय सय जीव घेऊनी जाते हवे कशास मग उसाश्यांचे भान कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते काय चमत्कार होतो..शब्द मूका करते भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते हवे कशास मग उसाश्याचे भान तु येतेस होवोनी रानीचे पान पावसाळी शहारा.

पाण्यात शिजवलेले अंडे

लेखक सुनील यांनी बुधवार, 29/07/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
अंडयाचा एक सोपा आणि पौष्टिक प्रकार. साहित्य - अंडे पाणी विनेगर मीठ-मिरी (चवीप्रमाणे) कृती - १) पाणी उकळत ठेवावे २) त्यात थोडे विनेगर घालावे ३) पाण्याला उकळी आली की त्यात अंडे फोडून घालावे आणि आच मंद करावी ४) अंड्याचा पांढरा भाग घट्ट झाला (सुमारे २ मिनिटे) की आचेवरून काढावे ५) पाणी गाळून टाकावे ६) शिजलेल्या अंड्यावर मीठ-मिरी भुरभुरावी टीप - सध्या श्रावण सुरू असल्यामुळे मला फोटो टाकता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

धोंडोपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

लेखक सागर यांनी बुधवार, 29/07/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज धोंडोपंतांचा वाढदिवस मिसळपाव वर आपल्या ज्योतिषविद्येबरोबरच छंदबद्ध कवितांनीही सर्वांना दिपवून टाकणार्‍या धोंडोपंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा... :) येणारे वर्ष पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा ~सागर

फोडणीचा ऊस

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/07/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फोडणीच्या गंडेर्‍या ही पाककृती http://misalpav.com/node/8730 या लेखना वरून आठवली आहे. त्यामुळे लगेच फोटो उपलब्ध झाला नाही साहित्य : मस्त पुंड्या उसाच्या गंडेर्‍या तीन वाट्या, तेल १ चमचा , मोहोरी १ चमचा, हळद ,कढीपत्ता , लाल मिर्ची , लिंबाचा रस तीन चमचे, मीठ चवीपुरते. मस्त पुष्ट पुंड्या उसाच्या साधारण अर्धा इंच आकाराच्या गंडेर्‍या करून घ्याव्या, त्या मिठाच्या पाण्यात तासभर भिजत घालाव्या, तेल तापवून त्यात मोहोरी हळद आणि मिर्चीची फोडणी तयार करावी. उसाच्या गंडेर्‍या कढईत गरम कराव्या.

नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 29/07/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar पुर्व प्रसिध्दी - अनुभव मासिक ------------------------------------------------------------------------------ नवीन वर्ष माझ्यासाठी शुभेच्छा असलेल्या भेटकार्डांचा नॉट पेड लिफाफा घेऊन अवतरलं. राजकारण्यांसाठी ते मतपेट्या घेऊन आलं होतं. दोन्हीही नॉट पेडच! मला शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी दहा रुपये खर्च करावे लागले. राजकारण्यांना खूपच "नॉट पेड' चार्ज चुकवावा लागेल. माझ्या आसपास "लोकशाही वाचवा...प्रजातंत्र वाचवा...घटना वाचवा...' अशा घोषणा दिल्या जाताहेत.

फॉर्च्युन डिजाईन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 29/07/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर मिपाकरांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता. दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे.

अजूनही... अजूनही...

लेखक कौतुक शिरोडकर यांनी बुधवार, 29/07/2009 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लड तुझे ते वागणे करते गुन्हा... मुग्ध मुग्ध रे सावध कटाक्ष टाकणे करते पुन्हा... लुब्ध लुब्ध रे अजूनही... अजूनही.... कधी गंध देती वार्‍यासही तुझ्या मोकळ्या केसांच्या बटा कधी कुंद करती तार्‍यासही तुझ्या बोलक्या डोळ्यांच्या छटा मकरंद अधरी तोलती सखये तुझे... शब्द शब्द रे अजूनही... अजूनही.... तुझी कंकणे झंकारती सप्तसुरांच्या अलवार ताना तुझी पैंजणे नादावती अधीर मनाच्या स्पंदनाना प्राजक्तापरी हासणे झुलती सुखे... बद्ध बद्ध रे अजूनही... अजूनही.... ही देहबोली वेडावते वना श्रावणी पिपासा जणू अस्तित्वाचे नभ व्यापते इंद्रधनुचा उसासा जणू फिरत्या जगाचे पाळणे होती मुके... स्तब्ध स्तब्ध रे अजूनही...
काव्यरस