अशीच एक गोष्ट...
भाल्या आपल्याच तंद्रीत बिडी ओढत बांधावरुन घराकडं चालला होता. वेळेची आणि आजुबाजूला काय चाल्लयं ह्याची त्याला अजीबात जाणीव नव्हती. तितक्यात मागून आवाज आला... "अरे ये भाल्या! थांब जरा... मी पण येतो". मग दोघे सोबतच चालू लागले...
"बिडी दे रे" सोबतचा म्हणाला...
भाल्यानं त्याला बिडी दिली...
सोबतचा "झकास... ३० नबंर!!!... हीच ओढतो मी रोज..."
इकडच्या्-तिकडच्या गप्पा मारत दोघे चालत होते...
तितक्यात..."बिडी दे रे" सोबतचा परत म्हणाला...
ती पण संपली... परत सोबतच्यानं बिडी मागीतली... भाल्या मात्र अजून पहिलीच बिडी ओढत होता... त्याला बिडी दिली आणि भाल्या जरा दचकलाच...
मिसळपाव