Skip to main content

थोडी जाणीव हवी...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
ट्राफिक सिग्नलवर एक मुलगा भीक मागायला येतो... आळशी आहेत... ह्यांना भीक मागायची सवय लागलीयं असं आम्ही म्हणतो... खीशातून २ रुपये काढून त्याच्या हातावर टेकवतो... आज फार उपकार केले ह्या अविर्भावात मग आम्ही मिरवतो... खरंच ते आळशी आहेत का? हे आम्ही पडताळत नाही... आणि पडताळणार तरी कसे?...

गादी

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 31/08/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| अशी असावी गादी जवळी. श्रीमंतीची जणू ही गोळी. द्रौपदीची असेच थाळी विक्रेत्याची मग गुपचिळी ग्राहकाची बसे दातखिळी फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| साधीसुधी गादी नसे नशिबाचे फिरले फासे भागामागून भाग येतसे मिपाकरांना वेठितसे सर्व्हरवरती ताण बसे फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| गादी घेतो भाग आवरा मालिकेचा रस्ता सावरा लेख पाहुनी जीव घाबरा मिपाच्या ह्या "व्होल वावरा" जाउ नका "एनी व्हेअरा" फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
काव्यरस

स्थलांतराचा धार्मिक संदर्भ

लेखक भोचक यांनी सोमवार, 31/08/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्थलांतरीतांच्या प्रश्नाला प्रांतिक किंवा भाषक संदर्भच नसतात. त्याला धार्मिक संदर्भही बराच आहे. आपल्या देशात बांगलादेशातून होणारे स्थलांतरही याच सदरात मोडते. बांगलादेशीय मुस्लिमांच्या आसाममधील वाढत्या संख्येने तिथे जातीय दंगली पेटल्याचा इतिहासही ताजाच आहे. अधून मधून ही धुसफुस पुन्हा डोके वर काढते. पण त्यापलीकडे जाऊनही भारतात धार्मिक स्थलांतराचा प्रश्न अजूनही म्हणावा तितका गंभीर नाही. (किंवा आपण तो घेतला नाही, असंही असू शकेल.) पण युरोपात मात्र या धार्मिक आणि स्पष्टपणे सांगायचे तर मुस्लिमांच्या स्थलांतराने मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतात मुस्लिम आले त्याला हजार वर्षे झाली.

धा धिन धिन धा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांचा डफ, तडीतेची थाप गगनाच्या अधरी, मल्हारराग लय.. जलतरंग, भुई छेडीता तालास येई, लयबद्ध जाग पवनाने धरिला सुर अन नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा शुभसुंदर .. अरूपाचे रूप गौरीतनय .. तो गण नृप लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप आल्हादघन, सांबनंदन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा पदी पैंजणे .. झंकारती रसभाव मुखी .. साकारती तुंदील तन .. मोही मती अंगांग मीन, मुद्रेत लीन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा आकाशगंगा .. तेजाळली नक्षत्रे नभी .. उल्हासली चैतन्यगंधी .. हर्षावली विश्वाचा मंच, अपुरे अनंत नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
काव्यरस

मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 31/08/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले. "तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं" असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं, "घरी सर्व ठिक आहेना?" "ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?" प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर

उरणचे काही गणपती...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरचा गणपती आमच्या घरचा गणपती सार्वजनीक गणपती (माझा आवडता) खूपच सुंदर मुर्ती आहे (एकदम जीवंत) सार्वजनीक गणपती

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -३

लेखक दशानन यांनी रविवार, 30/08/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग.. २ हम्म्म... थोडे थोडे कळाले आहे.. तुला काय सांगायचे आहे ते... पण जरा क्लियरली सगळे पुन्हा सांगशील का मला ? ही एवड्या स्पीड मध्ये बोलते.. की काही मुद्दे कळतच नाहीत... खरं तर मला कळतं.. पण तिचा आवाज पुन्हा पुन्हा माझ्या कानावर पडू दे म्हणून मी जवळ जवळ प्रत्येक गोष्ट.. रिपीट करायला लावतो.. मी.. हे तीला कसे कळणार. मला वाटतं ती मला अजून पण मंदच समजते... व विसराळूपण.... विसराळू आहे.. पण मंद.. ह्मम्म मी नाही... आता राहिली तीची अडचण... मोठी अडचण आहे... काय करु शकतो हे बघावे लागेल.. हिला संध्याकाळी फोन करायला सांगतो..