Skip to main content

शोध

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी रविवार, 06/09/2009 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
हि "गझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र याला 'गझल सदृष्य' काव्य म्हणेन फारतर. मिपावरील लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळची सोनेरी किरणे माझ्याशी पोचलीच नाहीत धुक्यात हरवला माझा मी गाव शोधीत राहीलो शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो देहगंधाच्या नशेने श्वास भरून घेतलेच नाहीत सोडावया नि:श्वास मी वाव शोधीत राहीलो

भरकटलेली चर्चा

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/09/2009 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
भरकटलेली चर्चा . वाचक हो, माझा नाडीग्रंथावरील लेखनाचा मूळ हेतू भाग 6 मधे बोध अंधश्रद्धा पुस्तकाची निर्मिती कशी व का झाली हे नोंदवायचा होता. त्यात एक माहिती म्हणून त्यातील मलपृष्ठवरील अवतरणे उद्धृत केली होती. मी कोणाला तेंव्हा किंवा आत्ता आव्हान दिलेले नव्हते व आज ही देत नाही. त्यामुळे आजून कच्चा किंवा खडूस किंवा अन्य कोणालाही नाडी भविष्य पहायचे असेल तर त्यांना सोईच्या नाडी केंद्रात जाऊन जरूर पहावे. जसे अन्य असंख्य लोक पाहतात.

मदत

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 05/09/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या निरीक्षणाप्रमाणे, मिसळपावावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणांपैकी काही ढकलपत्रांमधे प्रसिद्ध होत आहेत.... त्यातून लेखकांचे नाव अत्यंत खुबीने वगळले जात आहे. हे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? नियम काय आहेत? इंटरनेट वरच्या कॉपीराईट संबंधी काही मार्गदर्शन मिळू शकेल का?

आकाशवाणी

लेखक सुबक ठेंगणी यांनी शनिवार, 05/09/2009 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता! इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.
काव्यरस

वाट सागरदुर्गाची . . . .अर्थात सागरगडाचा ट्रेक

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 04/09/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. सागरगडावर जाण्यासाठी वाघेडे गावांत जावे लागते. पेण-पोयनाड मार्गावर असलेल्या पेझारी फाट्यावरुन वाघेडे गावाकडे रस्ता जातो. अंतर अंदाजे अर्धा कि.मी. हे अंतर काटल्यावर आपण वाघेडे गावांत येतो. हे सागरगडाच्या पायथ्याचे गांव. गावाच्या मागच्या ठाकरवस्तीपासनं रस्ता आहे. ठाकरवस्ती डाव्या हाताला ठेवून चालत निघालं कि एक डोंगर लागतो तो पार करायचा आणि चढाई कायम ठेवायची. रस्ता बरोबर असल्याची खूण म्हणजे वाटेतच उजव्या हाताला रस्त्यालगतच भग्न अवस्थेतील एक दगडी नंदी दिसतो. नंतर अजून एक डोंगराचा टप्पा लागतो इथे वाटेवर सागाच्या पानांचा सडा पडलेला दिसतो.

म्हाळसाक्का..२

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 04/09/2009 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का.. भाग १ "मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले.. "मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली. तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं. *********** तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढतला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्‍या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्‍या हलचालींकडे बघतच राहिला.

(दगड)

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 04/09/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
सनक : http://www.misalpav.com/node/9230 डोक चालवल तरी समजत नाय डोल फारुन बगल तरी दिसत नाय वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय हे ठोकून सांगनार्‍या म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर विश्वास टाकुन मी समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो न माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.
काव्यरस

बाबासाहेब ते भैय्यालाल...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 04/09/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत... महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना... मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त... तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना समाज दूर सारत होता | आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून आपली ओळख जपणारा...
काव्यरस

औडिओ कसेट्स मधील ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प (!)

लेखक वारकरि रशियात यांनी शुक्रवार, 04/09/2009 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, जवळजवळ दररोज मिपा वर वाचनमात्र असतो, पण आज बर्याच दिवसांनी येथे लिहितो आहे. माझ्या संग्रही काही दुर्मिळ - लाइव्ह ध्वनीमुद्रणे आहेत. (उदा. मालिनीबाईंची सातारा येथील मैफल, गजाननबुवांचे व्हायोलिन इ. तसेच काही अधिकारी व्यक्तींची गीता, भागवत इ. वरील प्रवचने ) पण ही सर्व ध्वनीमुद्रणे जुन्या काळातली असल्याने औडिओ कसेट्स वर आहेत. अनेकवार वाजवून आणि कालमानाने हळूहळू या औडिओ कसेट्स खराब होत जातील. त्यांचे दीर्घकाळ जतन व्हावे व आस्वाद घेता यावा म्हणून अधिक खराब होण्यापूर्वी ही सर्व ध्वनीमुद्रणे सी.डी. वर घ्यावीत असा विचार आहे. मला या तंत्राविषयी काहीच माहिती नाही.

नाडी अनुभव -स्फुट

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 04/09/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ तुमच्या अंगठयाच्या ठशावरून काढलेल्या नाडीपट्टीत तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, तुमची कुंडली, तुमचा वर्तमान काळ, भूत, भविष्य सर्व काही कस काय सापडत ब्वॉ? दक्षिण भारतातील हे नाडीग्रंथ महाराष्ट्रातही आले आहेत. २०-२२ ठिकाणी ही नाडीकेंद्रे जोरात चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी पाच केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तेथे भेट दिली असता तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो.