'नव'कविता
नव्या मनुची नवी माणसे, नवहृदयाची नवभाषा
नवे रंग हे नवीच आशा, नवक्षितिजे अन नव्या दिशा
नवजीवनाच्या रांगोळीत हे, भरून टाकशी रंग नवे
सुखदु:खाच्या ठिपक्यांमधली, जागा भरूनी काढू सवे
शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना
नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा
गाऊ आपण गीत नवे, तो राग नवा, हा ताल नवा
नव्या बंदीशी, नवीन भाषा, अपुला गावा ख्याल नवा
अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या
नव-वाटेचे नवीन फाटे, ध्येय नवी अन दिशा नव्या
वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे
किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे
हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे
नवपर्वाच्या सुरवातीला
मिसळपाव