Skip to main content

कथा प्रवृत्ती निवृत्तीची

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/09/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८ राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ." "फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर.

मर्यादा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 09/09/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
रौद्र तांडवे अंगे घुसळीत चंद्रमोहीत श्वासा सोडीत युगायुगांचे जीवन पेरीत सांभाळली मर्यादा कोटी कोटी मस्त्य थवे एक दुजांचे जीवन नवे मनुजही घेती थोडे बरवे सांभाळूनी मर्यादा नद्या मुखींचा गाळ गळोरा त्यामधूनी ये विश्व आकारा खाडी बनली मस्त्य धुमारा सांभाळूनी मर्यादा खोल तळाशी भुतल क्रंदन ज्वालांचेही रसमय नर्तन सागर अद्भुत खेळ चिरंतन सांभाळूनी मर्यादा जसा होतसे मानव सक्षम सागर भासू लागे धनसम कसे लुटू दोनच कर मम यंत्रे वाढवू मर्यादा अगडबंबशी जाल रोवीली मस्त्यथव्यांची रास खेचली कोटी तृणागत मृत फ़ेकली उधळण अमर्याद खाडीप्रत जाती मस्त्यथवे धारून अंतरी बीज नवे विषमयी गटारे तेथ मिळे हत्याकांड अमर्

आणि त्यावर म्हणा..

लेखक शाहरुख यांनी बुधवार, 09/09/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
मरा मारा आणि त्यावर म्हणा भारत माझा देश प्यारा खा खिलवा आणि त्यावर म्हणा या भ्रष्टाचाराला घालवा थुंका पचका आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी स्वच्छता राखा पाडा ढकला आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी रांगेतनं चला मी तर म्हणतोयच आणि त्यावर तुम्हीही म्हणा.. -- कवी शाहरुख

चड्डीवाला आणि माकडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 09/09/2009 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डीवाला आणि माकडे एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत. त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

कुरुंदवाडचा अनोखा गणेशोत्सव..!

लेखक सुहास यांनी बुधवार, 09/09/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..! आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही..

"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 08/09/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग. भंगार भरणे: पहा आकृती १ व २Fig 1: Filling the charging bubkets आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते.

म्हाळसाक्का.. ३

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 08/09/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का १ म्हाळसाक्का २ तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू..

पावलांचे सांगाती

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/09/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
नाडीवरील धाग्यांनी अजीर्ण झालेल्यांना हलकासा सुंठवडा पावलांचे सांगाती देह देवाचे मंदीर म्हणायची पद्धत आहे. त्या मंदिराचा भार पावलावर असतो. बालपणात मऊमऊ तळव्यांच्या अनवाणी पावलांनी बागडणारे वाय जरा मोठे झाले की आपले सांगाती शोधायला लागतात. काहींना काटे-सराटे बोचल्याने् तर काहींना चिखल राड्यातून वाट काढायला लागल्याने बोटांच्या बेचक्यात काहीतरी सरकवून द्यावे लागते. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात.