खाणावळ
शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला.
"काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं.
"काही गरज आहे एवढ्या रात्री निघायची ? सकाळी निघालो असतं तर चाललं नसतं ? पण नाही... मी म्हणतो तेच खरं. कोणाचं ऐकशील तर शपथ." एकदाची त्याला बडबडून ती मोकळी झाली. थोडक्यात का होईना पण मनातलं सगळं कचकचून बाहेर आलं आणि तिचं तिलाच बरं वाटलं.
"गोड दिसतेस गं चिडलीस की." त्याने तिची ती चिडचिड मनावर घेतलीच नाही. तिने त्याच रंगात त्याच्याकडे पाहीलं आणि तो गोडसा हसला. तशी ती विरघळली.
मिसळपाव