Skip to main content

जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 28/10/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला, वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा, ड्रोन ड्रोन ड्रोन प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी वादळवारे प्रतीक कॅत्रिना घोरी महमद कैफ वासना दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम लाटावाटा कोमल भाटा महापुरातील लव्हाळत्राता लायटर फ़ायटर रुधिरवंचिता मेजर्मायनर धेनुवल्लभा विहिरीतेली बॆरलबॆरल वजिरीस्तानी क्वीन घायल ड्रोन ड्रोन ड्रोन

प्रतिसादक उत्क्रांत होतो का?

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. मिपावर यापुर्वी सिद्धहस्त टवाळकांविषयी चर्चा झालेली आहे. पण मिपावर यापुर्वी सिद्धहस्त प्रतिसादकांविषयी चर्चा झालेली नाही. या प्रतिसादकांपैकी काही जण आजकाल फारसे प्रतिसाद लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच प्रतिसाद लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे प्रतिसाद आवडले त्या प्रतिसादकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे.

लेखक उत्क्रांत होतो का?

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी मंगळवार, 27/10/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. या लेखकांपैकी काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे लेखन आवडले त्या लेखकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन लेखक रामदास, श्रावण मोडक आणि संजोप राव हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय ललितलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच राव यांनी 'माझे खाद्य-पेय जीवन' ही लेखमाला सुरू केलेली आहे. रामदासांचा धातुकोष आणि मोडकांच्या श्रावणनोंदी लेखमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही.

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 27/10/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते ! आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore.

अचानक....

लेखक नेहमी आनंदी यांनी मंगळवार, 27/10/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
अ्चानकच तूला अस समोर बघितलं आणि काय झालं न कळे शुष्क असलेल्या जिवनात एक कोम्बं अंकुरलं..... निगा राखावी तर कशी कळेना पाऊस प्रेमाचा कधी पडेना रान वाळवंट झाले.... ग्रिष्माचे रण माजले.... मग केले हद्दपार पावसाला या जिवनातून तुझ्यासकट...... आणि पुन्हा अचानक.... हो अचानकच..... तू समोर आलास.. ठरवलं होत थेंब हे पडु द्यायचे नाहित तरी उगाच पाणी तरळले झिरपु नकोस म्हंटल तरी हा पाऊस कोसळलाच प्रसन्ना जीके
काव्यरस

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

ढेकर...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 27/10/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
वार - प्रतिवार... शह - काटशह..., अरे ला कारे.... नुसतेच सारे..., शब्दांचे पसारे....! नखं गळालेला जर्जर वनराज, त्याच नखांनी परस्परांशी..., झुंझताहेत छावे...! सामर्थ्य, सत्ता ... अनुत्तरित...? प्रश्न अस्मितेचा (?) विखुरलेले सारे कळप मेंढरांचे! बलाबलावरुन भांडताहेत ... अनियंत्रित...,मेंढपाळ भरकटलेले! त्यांचे राजकारण, फरफट कुणाची? कुणीही यावे टिकली मारुन जावे नियती आमची कधी बदलणार? संतप्त, विव्हल ... गांधारीचे शाप ... आम्हालाही कायम भोवणार...! आमच्याच भांडणात... सत्तापिपासु लांडगे... नेहमीच ...,मेजवान्या झोडणार! आम्ही तसेच उपाशी.... ते मात्र सुखाचा ढेकर देणार ! विशाल

आनंदी आनंद गडे

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 27/10/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले. हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही. कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही. कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते. खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती. कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते. तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला. तेवढाच विचार करायला वेळ. तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता..