Skip to main content

मुक्तिदाता

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 31/10/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
अ-भाव, किर्र, काळा, शून्य, कभिन्न, अंधार! मनांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही पाणावलेल्या डोळ्यांत, उकललेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, निःशब्द रात्री, अबोल दिवसाही भारलेल्या जन्मकैदेत, आभास अन् अस्तित्त्वाचा अनासक्त मुक्तिदाता काळाकभिन्न अंधार!
काव्यरस

(गुलमोहोर)

लेखक चेतन यांनी शनिवार, 31/10/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसन्ना जीके यांची गुलमोहोर वाचुन सुचलं :& काय सांगु ती स्वाइन फ्लु ची साथ ऑगस्टपासुनच आहे त्याच्या हातात मात शाळेत जाताना रस्त्या रस्त्यावर त्याचे अधिष्ठान हिरव्या पांढर्‍या मास्कमधुन हळुच डोकावते नाक अन् कान ताप येता हुरहुर लागतसे जीवा सर्दीपडश्या मागे स्वाईन नसेल ना हा घोर जीवा सर्दीच्या सोबतीने श्वास फुलतसे बडा कुंद वारे वाहताना समोर व्हेन्टीलेटर खडा हिरव्या कापडांच्या भीतीने थिजले माझे मन इथे तरी स्वाइन नसावा आस मनी धरुन पुर्ण व्हावी याचना असे वाट्तसे मनोमनी काय दुर्भाग्य माझे सापडला स्वाइन रिपोर्टमधुनी जातानाही स्वाईनला सांगा साथ
काव्यरस

जखमि चित्रबलाकाचे पसायदान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 31/10/2009 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- जखमी चित्रबलाकाचा अलारिपु राम राणा, कृष्ण कान्हा, देवकीचा दीव्य पान्हा, मंत्र जागर होउदे, पाप साप मोजमाप, कृष्णस्पर्ष, कर्णकर्ष, कोमेजुन जाउदे यंत्र तंत्र मूलमंत्र, अस्त्र शस्त्र धुतवस्त्र , सागरास आचवूदे सामदाम दंडभेद, नीतीला उभा छेद, कोदंडधारी तळपुदे स्वार्थपार्थ, दुर्गत धर्म, उग्र चर्म, साधी सुधी, नग्न द्रौपदी, गिरीधारी जन्मुदे, पुण्य विदीर्ण, लोभी कर्ण, नीलवर्ण, धुम्रवर्ण, कुंभकर्ण जागुदे, कांचनलोभी पतित पती, कामेप्सुना कुलटा भार्या, कुलघ्लानां कराल पौत्रं, तृतीय नेत्र बरसूदे, सद्योवैगुण्यमायान्ति, शेष शयनी, कुंडलानी, फणा काढूनी येउदे ए आई मला पावसात जाउदे, एकदाच ग भिजुनी
काव्यरस

आदरान्जलि

लेखक सन्दीप यांनी शनिवार, 31/10/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज दि.३१/१०/२००९ लोहपुरुश श्री.सरदार वल्लभ भाइ पटेल यान्चि जयन्ती तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यान्चि पुण्यतिथी . ह्या निमीत्ते वरिल दोघ्हनाहि माझी आदरान्जलि. सन्दीप

गुलमोहोर

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 31/10/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु त्या गुलमोहोराची साथ बालपणापासुन आहे त्याच्या हातात हात शाळेत जाताना अर्ध्या रस्त्यावर त्याचे अधिष्ठान लाल गोजिऱ्या फुलांमधुन हळुच डोकावे हिरवे पान वयात येता हुरहुर लावतसे जीवा टपोऱ्या फुलांच्या खाली असे थोडा गारवा वाऱ्या सोबतीने पडतसे फुलांचा सडा धुंद वारे वाहताना सोबती गुलमोहोर खडा हिरव्या पानांच्या मखमालीने फुलले माझे मन त्या घरी ही गुलमोहोर असावा आस मनी धरुन पुर्ण व्हावी कामना असे वाट्तसे माहेरी काय सौभाग्य माझे दिसला गुलमोहोर दारी जातानाही गुलमोहोराला सांगा साथ माझी करशील सरणावरती लाल फुलांची रांगोळी तू रेखशील प्रसन्ना जीके
काव्यरस

खुर्ची बरोबर खोलीचा पण हव्यास...

लेखक जयदीप यांनी शनिवार, 31/10/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी "सकाळ" मधे वाचल.. सध्या सर्व नविन आमदाराना मुबई मधे आमदार निवास मधे खोल्या देण्याचे काम चालु आहे. त्यात सुद्धा जनतेचे नवे आमदार घुसखोरी करायचे सोडत नाहीत... कॉग्रेस च्या एका नविन आमदाराने मनसे च्या एका आमदारा ला लेखी पत्राने मिळालेल्या खोलीचे कुलुप फोडुन स्वताचे कुलुप लावले आणि ती खोली बळकावली. हे लोक काय राज्य करणार हो?

'अग तारा गाव झोपलाय सारा'

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/10/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
'अग तारा गाव झोपलाय सारा' हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे. गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो. हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात.

रक्तदान महादान आपला प्रतिसाद खुप महत्वाचा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 30/10/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आत्तच ओ निगेटीव्ह रक्त हवे असल्यचे वाचले आणि वाटले "जे जे आपणासी ठावे , दुस-यासी सांगावे" १.you can visit here = www.indianblooddonors.com OR get info via sms on ur cell ......... type blood (space) STD code (space) blood group (space) your name & send it to 5676775 क्रुपया खरे की खोटे हे तपासण्यासाठी sms करु नका.

(बलुतं)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 30/10/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;) तसा अनेकांनी प्रयत्न केला त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा, फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्‍या दादाला सरळ करण्याचा, षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना विडंबनरुपी विरजण घालण्याचा, पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... दहावीला असंख्य कल्पना पुजुनच जन्माला आलाय तो... गटण्यासारखाच... म्हणून तर .... किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... जसा पहिल्यांदा तसाच आताही.......
काव्यरस

नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लू

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 30/10/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नवी दिल्ली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्‍याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे. मोदी बुधवारीच रशियाच्‍या दौ-यावरून परत आले असून तेव्‍हापासून त्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत. नरेंद्र मोदी चार दिवसांचा रशिया दौरा करून बुधवारी रात्री परतले आहेत. तेव्‍हापासूनच त्यांना त्रास जाणवू लागला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते आपल्‍या कार्यालयात होते. मात्र त्‍यानंतर ते घरी निघुन गेल्‍यानंतर त्यांच्या तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. सध्‍या मोदी यांचे तीन दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आहेत.