Skip to main content

यम धर्म

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 03/11/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काळा मिट्ट अंधार. अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला. (आजकाल तास म्हणत नाहीत) विज कधी येणार ते माहीत नव्हते. मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.? समोर बसलेला मास्तर तरणा होता. चेहेरा तरारलेला. मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती. नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्‍या शिक्षकापेक्षा वेगळा. शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली. अजुनही तशीच. १२ फुटावर छत. पत्र्याचे मोडके पंखे तुटकी बाके. माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती. शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती. ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती. अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपन

स्वाक्षरीसंदेशगाथा

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/11/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली.

भाववाढीच्या विरोधात मनसे काय कार्यवाही करेल ?

लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 03/11/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाववाढीच्या विरोधात मनसे काही करू शकेल का ? की मराठीच्या मुद्दयावरच भांडत बसणार ? मनसेच्या संकेतस्थळावर 'सूचना करा' या सदरात मी भाववाढीच्या विरोधात मला 'मनसे'कडून काय अपेक्षित आहे त्याची सूचना म्हणून ही सूचना पाठवली आहे. पाहूया मनसे काही हातपाय हलवते का ते जनतेसाठी.

वाट पाहतोय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 03/11/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
तु नाही म्हणालीस, ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात, माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं इवलसं घर उध्वस्त झाले पण परसातली रातरानी तशीच आहे, ती वाट पाहतेय, कोणाची ते माहीत नाही अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे, त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही, त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे , का कोणासाठी ते माहीत नाही आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ, आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय, घराकडे येणार्‍या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन, का कोणास ठाउक ...

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

त्रिपुरी पोर्णिमा

लेखक अश्विनीका यांनी मंगळवार, 03/11/2009 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात. तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते.

फोलपटरावांची मुलाखत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 02/11/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्राच्या रामरगाड्यातील वेळ काढुन मराठी ब्लॉगविश्वात स्वत:चे एक स्थान बनवणार्‍या देवीदास देशपांडे तथा डीडी यांच्या दुनियेत फोलपटराव भेटले. चित्रपट निर्माते दिग्दर्शक फोलपटराव यांची मुलाखत आहे तशी राजकारणी फोलपटराव यांची देखील मुलाखत दोन भागात आहे आपण जरुर डीडीच्या दुनियेत फेरफटका मारा.

ऋतूचक्र

लेखक वाचक यांनी सोमवार, 02/11/2009 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतोय मला वसंताच्या चाहूलीत मोहरलेला डेरेदार आंबा घमघमणार्‍या सुगंधाची कोकिळा गातेच आहे अजून माझ्या मनात अजूनही आठवतात मला ते तापलेले रस्ते आणि माझ्या हातात तुझा हात पेटलेल्या गुलमोहरा खालून जाताना अंगावर पडलेला फुलांचा सडा, जळणार्‍या आषाढाच्या पहिल्या पावसानंतरची घमघमणारी ओली माती जमलेच नाही तो मॄद्गंध बंदिस्त करुन ठेवायला मनाच्या कुपीत कधी... पावासाची झड लागलीये बाहेर आत्ताही आणि तेव्हाही असाच कोसळत होता त्या अविरत पडणार्‍या पावसामध्ये शोधतो आहे तुलाच मी, माझ्याही नकळत पानगळीचे दिवस आणि रंगांची उधळण, झाडे कात टाकतायत जुनी, जीर्ण सामोरे जायचेय त्यांना एक नव्या जगण्याला; तयार व्हा

फुलपाखरू छान किती दिसते !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 02/11/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यापासुन ७-८ किमी अंतरावर ओवळा म्हणुन गावकुसाचा भाग आहे. तेथील एक सुशिक्षित शेतकरी श्री. राजेंद्र ओवळेकर यांनी त्यांच्या वाडीवर फुलपाखरे जोपासली आहेत. कालच्या रवीवारी मटामध्ये त्यावर एक छोटासा लेख आला होता. तो वाचला आणि तिथे जावून धडकलो. दुर्दैवाने आम्ही चुकीच्या वेळी संध्याकाळी गेल्याने फारशी फुलपाखरे पाहायला नाही मिळाली पण राजेंद्रजींकडुन खुप माहिती मिळाली. इच्छुकांसाठी ... श्री.