Skip to main content

मृगजळ

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 05/11/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू नाहीस, की जसा पाउसही नाही चातकास मेघाचे दर्शनही नाही हुडकत होतो प्रेमाचा झरा मी नशीबास मंजुर मृगजळही नाही वेड्या मनास साथ असे सुरांची रडण्यास खांदा जवळ एकही नाही आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही मिळता न तु सांग काय करेन मी? "तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही" काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस

विकांत - मालवण (तारकर्ली).....

लेखक नाम्या झंगाट यांनी गुरुवार, 05/11/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

बुधवारची कविता: (दु:ख)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 05/11/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचे प्रतिसाद उडू नयेत म्हणून प्रयत्न करतात सदस्य माजू नये म्हणून कात्री लावतात तरीही जमले ना की त्यावर बा*वला भां** करतात संमालक माणसे पण इथे कंपूं सुख मिळू देत नाही अथवा उडलेल्या पोस्टमागे त्याना होत नाही दु:ख इथेच सगळी गोची आहे. क्रिप्टीकने पछाडलेले सदस्य चवचालपणा करणारी तरुण पोरे मिभोबळी,पाध्येबळी, डबलबॅरलबळी होणारे गटणे विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे हे सगळे जेव्हा बोर्डावर येत तेव्हा संपादित झालेले असते धुतलेले, बडवलेले, फाट्यावर मारलेले असते जळवणारे असते कोण म्हणे- कंपू वाईट नसतात, संपादकही चलाख असतात
काव्यरस

एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 05/11/2009 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवा़ळी अंकात आधीच प्रसिद्ध झाला आहे. तो अंक प्रकशित होऊन ३ आठवदे झाले म्हणून इथे अपलोड केला आहे. लिपी दुसरीच (लोकसत्ता फ्रीडम) आहे, गमभन नव्हे. त्यामुळे शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती! एका आधुनिक हरिश्चंद्राची करुण कहाणी सुधीर काळे, जकार्ता एक प्रामणिक तरुण आपल्या ध्येयवादी व देशभक्तीपूर्ण भूमिकेमुळे व कायदापालनाबाबतच्या ध्यासापायी कसा दारुण अवस्थेला पोचला आणि सरकार एकदा का आपल्या मागे लागले कीं काय अवस्था होते याची ही दर्दभरी कहाणी आहे.

परछाईयां

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 05/11/2009 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
वो जो हममें तुममें करार था... रे सा ध प म ध प म सा रे सा गझल आवडीचीच. गायकही पुरेसा रंगलेला आहे. वो जो हममें तुममें कराssssssर था, तुम्हे याद हो कि ना याssssssssद हो... म ध रे सा नी ध प ध नी ध प म प म ग रे सा सा रे सा... वोही यानी वादा निबाह का, तुम्हे याद हो कि ना हो... आलापी सुरू राहते... विचारांच्या आंदोलनात घेऊन जाण्यास पुरेशी. ईज इट द बिगिनिंग ऑफ द एण्ड? कदाचित. मला नक्की नाही सांगता येणार. काही तरी गडबड आहे हे नक्की. "प्लीज. मला काही दिवस एकटेपणा हवा आहे," हे तुझं वाक्य... त्या दिवशीचं. *** थंडीची करामत कशी असते पहा.

एक प्रवास.... भाग १

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/11/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल.

मंडळ निघालं गोव्याला

लेखक प्रभो यांनी बुधवार, 04/11/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

(कवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 04/11/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन स्वतःला कवी समजुन काहीजण प्रयत्न करतात ढापले म्हणु नये म्हणून शब्द बदलतात समोर जे जे दिसेल त्यावर कविता करतात भुक्कड माणसे! पण वाचकांना अर्थ लागतोच असं नाही अथवा डोके बंद करुन लिहित असतो कवी! इथेच सगळी गोची आहे फुलांनी नटलेला वसंत अल्लड हसणारी लहान मुले प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन् वर्षानोवर्षे चालणारे फुटकळ विषय सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा काव्य झालेले असते सजलेले, सजवलेले , व्रुत्ताच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
काव्यरस

[[मुक्तिदाता]]

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 04/11/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण मोडकांची माफी मागून- [मिपावर विडंबन अधिकृत साहित्य प्रकार आहे म्हणून हे धाडस; कृपया राग नसावा] बेलगाम, फुर्रर्रर्र गेला, बेभान, प्रसन्न पवार! पेठांच्या गल्लीबोळात, गर्दीच्या शनिवारातही उताराच्या भुसारीत, चढाच्या कात्रजातही ठरलेल्या वेळेत, जायची घाई नसुनही परवाच घेतलेल्या गाडीत, पुरती प्रॅक्टीस नसुनही वन्य प्राणीमात्रात, बांबूच्या दाट वनातही त्या गोंगाटाच्या रात्री, गणेश उत्सवातही ब्रेक नसलेल्या गाडीत, प्रसन्न बसतो फुकाचा कोण त्याचा मुक्तिदाता माहित असल्यास तुम्ही सांगणार!

आठवण

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 04/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ते आठवते का सारे? सर्द संध्याकाळी त्या गुंफुनी हात फ़िरलेले तुला ते आठवते का सारे? गर्द चांदण्या आकाशी अन गहिरे ते उसासे तुला ते आठवते का सारे? फुले उमलता प्रितीची मन हळवे झालेले तुला ते आठवते का सारे? पाठमोरा होऊन जाताना पाश सारे तोडलेले तुला ते आठवते का सारे? या देहाच्या धुरातून अश्रु तुझे दाटलेले तुला ते आठवले का सारे? प्रसन्ना जीके १५-१०-०८
काव्यरस