Skip to main content

'मिपा ताडीमाडी पुरस्कार!' 'माडीग्रंथ'! सर्व विडंबकांना एक विनम्र आवाहन...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 07/11/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सदर निवेदनामागे कुणाच्याही ज्ञानाचा अवमान/अपमान करण्याचा हेतू नाही. केवळ अन् केवळ करमणूक, मौजमजा आणि विरंगुळा हाच एकमेव उद्देश आहे..

डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 06/11/2009 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा. अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही.

सचिन....

लेखक कोदरकर यांनी शुक्रवार, 06/11/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
भारत क्रिकेट ... सचिन ने दिलेल्या नेत्रदीपक अनुभवा बद्द्ल त्याचे शतशः आभार... सचिन जिंकला... भारत हारला... हे असे नेहमी का होते...?

मध्‍यप्रदेशातील राज ठाकरे

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 06/11/2009 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीचा आणि स्‍थानिकत्वाचा मुद्दा उचलून मराठी तरुणांना रोजगार मिळावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज यांच्‍या आंदोलनाला आणि त्यातील हिंसक कृतीला हिंदी माध्‍यमांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून राज ठाकरेंना गुंड ठर‍वले. मात्र बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांना मध्‍यप्रदेशातही एक राज ठाकरे विरोध करतो आहे.

बाजार

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 06/11/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या प्रसंगाची प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते. ती प्रकट करायचे मार्गही वेगवेगळे असतात. कोणी एखादे काव्य करेल कोणी ललीत लेख लिहील कोणी सपाट गद्य लिहील कोणी त्या अनुभवाला रूपक मानून त्यातून वेगळेच काही उलगडून दाखवेल अनुभव तोच पण अभिव्यक्ती निराळी. काल मी दादरला फूल बाजारात गेलो होतो हा एक प्रसंग वेगवेगळे लेखक कसा मांडतील. डॉ अनील अवचटः दादरला पुलावरून वेस्ट ला उतरा समोर किच्च गर्दी दिसेल. फ्लायओव्हरच्याखाली कोपर्‍यात एका पानाच्या ठेल्याला लागून चेंगराचेंगरी होणार्‍या लोकल मध्ये असते तशी एकावर एक रचून ठेवलेली टोपल्यांची रास दिसते.

अल्पमोली बहुगुणी "आले पाचक"

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 06/11/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी तात्याच्या हाटेलात वेगवेगळ्या बल्लवाचार्यांचे वेगवेगळे शाकाहरी व मांसाहारी पदार्थ खाल्याने माझे पोट आनंदाने बहरले(फुगले,तटतटले). हा बहर काही केल्या ओसरेचना.

(तळतळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 06/11/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
तू नेलास, तर आज पाऊचही नाही बोटास चुन्याचे दर्शनही नाही हुडकत होतो चघळायला जरा मी ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही वेड्या तोंडा तलफ असे चिमटिची चावायला काडी जवळ एकही नाही खास पुडी अजूनही बॅगेत आहे पण आंत,नेहेमीची चुनापुडी नाही सांग नेता पाऊच काय करु मी? "चिमटीविना जगण्याची अजून खाज नाही" चिमटीची मागणी केल्यावर दिलेला पाऊचच मित्राने नेल्यानंतरची अवस्था.
काव्यरस

बदाम बर्फी

लेखक खान्देशी यांनी गुरुवार, 05/11/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
खान्देशात थंडी म्हटली कि चंगळ असते. येणाऱ्या कडक उन्हाळ्यासाठी शरीराला तयार करायला वेग वेगळे पौष्टिक पदार्थ जसे शुद्ध तुपातले मेथीचे लाडू ,डिंकाचे लाडू ,सुक्या मेव्याचे लाडू आजही घरोघरी बनवले जातात. हाताचे न राखून पाहुणचाराला सुद्धा ह्या गोष्टी दिल्या जातात. तसाच एक पौष्टिक पण बनण्यास सोप्पा पदार्थ इथे देत आहे .. बदाम बर्फी साहित्य :- एक कप बदाम, १/२ कप दुध , एक कप साखर, दोन चमचे साजूक तूप, १/२ चमचा वेलदोडा पूड कृती :- बदाम कोमट पाण्यात १०-१५ मिनिट भिजत घाला. मग बदामाची सालपटे कडून टाका. बरोबर अर्धा कप दुध आणि बदाम, साखर व वेलदोडा पूड ग्रैंड करा. मस्त बारीक पेष्ट झाली पाहिजे.