बदाम बर्फी
खान्देशात थंडी म्हटली कि चंगळ असते. येणाऱ्या कडक उन्हाळ्यासाठी शरीराला तयार करायला वेग वेगळे पौष्टिक पदार्थ जसे शुद्ध तुपातले मेथीचे लाडू ,डिंकाचे लाडू ,सुक्या मेव्याचे लाडू आजही घरोघरी बनवले जातात. हाताचे न राखून पाहुणचाराला सुद्धा ह्या गोष्टी दिल्या जातात. तसाच एक पौष्टिक पण बनण्यास सोप्पा पदार्थ इथे देत आहे ..
बदाम बर्फी
साहित्य :- एक कप बदाम, १/२ कप दुध , एक कप साखर, दोन चमचे साजूक तूप, १/२ चमचा वेलदोडा पूड
कृती :- बदाम कोमट पाण्यात १०-१५ मिनिट भिजत घाला. मग बदामाची सालपटे कडून टाका. बरोबर अर्धा कप दुध आणि बदाम, साखर व वेलदोडा पूड
ग्रैंड करा. मस्त बारीक पेष्ट झाली पाहिजे.
जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकून थोडे गरम झाल्यावर बदामाची पेष्ट ओतून मंद आचेवर मिश्रण हलवत राहा. साधारण १०-१५ मिनिटात मस्त गोळा तयार होईल. तूप लावलेल्या ताटली मध्ये मिश्रण पसरून थोडे थंड झाल्यावर वड्या हव्या त्या आकारात पाडा. डेकोरेशन साठी प्रत्येक वडी वर एखादा बदाम खोवला तरी चालेल.
वाचने
5725
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त
मस्त
मस्त...
पौष्टिक
छान!
का हो काजूकतली पण अशीच बनवली जाते का?
करायला हवी....
झक्कास
प्रतिसादासाठी .....
धागा उघडून पाहिलेला होता पण
मस्त !
छानच आहेत
छान सोपी
सोपी अन