Skip to main content

कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने अखेर डाव साधला

लेखक मड्डम यांनी सोमवार, 09/11/2009 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने अखेर डाव साधला. मनसेच्‍या आमदारांनी सभागृहात घातलेल्‍या गोंधळाचे भांडवल करून मनसेच्‍या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबनाचा ठराव विधीमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडला असून त्याला बहुमताच्‍या जोरावर मंजूर करून घेतले.

मी कात टाकली

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/11/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्‍याफुलक्‍या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!) कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे. बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता.

मलईदार खाती : यथामति उहापोह

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 09/11/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेले चार सहा दिवस मलईदार खाती हा शब्द फार वाचनात आला. कित्येक पत्रकारांनी न बनलेल्या सरकारवर आणि राजकारणावर तोंडसुख घेतले... दिल्ली मुंबई वार्‍या करत करत चर्चेच्या फेर्‍यांवर फेर्‍या आटोपत मलईदार खात्यांसाठी कष्ट करणार्‍या आपल्या नेत्यांबद्दल मला पूर्ण आदर आहे..... फक्त मलईदार खाती कोणती आणि मंत्र्यालाच मलई चाखायला का मिळते??काही विशिष्ट खात्याच्या मंत्र्यांनाच जास्त मलई चाखायला का मिळते?

जय महाराष्ट्र !! जय मराठी !!! अबुला धोपटला.. मनसे जिंदाबाद

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 09/11/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीत शपथ घेतली. हिंदीतून अबू आझमी शपथ घेत असताना मनसेच्या आमदार रमेश वांजळे यांनी त्यांच्यासमोरील माईक बाजूला केला. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या कानातही वाजवली त्यांनंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली. हिंदीतून शपथ घ्यायला मनसेचा विरोध होता. मात्र अबू आझमींनी हिंदीतून शपथ घ्य़ायचा हट्ट कायम ठेवल्याने त्यांना मनसेच्या आमदारांचा लाथा बुक्क्यांचा प्रसाद खावा लागला. (स्टार माझा वरुन साभार)

द लायन किंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो. लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता. खरतर ह्या अ‍ॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस.

लेखन स्पर्धा २००९

लेखक मोहन यांनी सोमवार, 09/11/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर लेखकांकरता माहिती, पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल. स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा. आपला मोहन.

कुणी मदत करेल का मदत?

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 09/11/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, माझ्या मनात सध्या एक स्वयंचलीत चार चाकी वहान घेण्याचा विचार आहे. त्या प्रमाणे मी चौकशीला सुरुवातही केलेली आहे. आणि खालील दोन पर्यायां पर्यंत माझी निवड मर्यादीत करण्यात सफल झालो आहे. मारुती वॅगनार किंवा सँट्रो या दोन पैकी कोणता पर्याय निवडावा यासाठी माझे तज्ञ मिपाकर मित्र मला मदत करतील काय? योग्य सल्ला देणार्‍या मित्राला ५० ग्रॅम चितळ्यांचे पेढे (पैसे मीच देणार... हो त्या वरुन नंतर भांडण नको).

सल्ला

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 09/11/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ला देतो तो सल्लागार. सल्ला मागतो तो सल्लामाग. ज्याच्या सल्ल्याने दारोदार भीक मागायची पाळी येतो तो सल्लादार. उदा: शेअर बाजारच्या चॅनेल्स वरती मिळणार्‍या टीप्स. आणखी एक सल्ला जो खाटीक मारतो तो - सल्लामार. "एक सल्ला हवा आहे. घरातल्या बायकांचे संतुलन बिघडले तर काय करावे"? बायका? मला एकावेळी अनेक बायकांशी डील करायचा अनुभव नाही हो. हे जमणारे लोक फार महान असतात. मला एकावेळी एकच बाईशी डील करायला जमते.(२०० कि.मी परीघात) " तसे नाही हो.

आठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई

लेखक दिपक यांनी सोमवार, 09/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.

नवीन सदस्य

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी सोमवार, 09/11/2009 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार, मी मिपा चा एक नविन सदस्य आहे, आणी गेले काही दिवस इथे नियमितपणे वाचन करीत आहे. मलापण काही वेळा प्रतिसाद द्यावासा वाटतो म्हणून मी सदस्यत्व घेतल. मला इतक लिहायला सुद्धा बराच वेळ लागला. काही अक्षरे तर लिहिताच आली नाहीत. क्रूपया मार्गदर्शन करावे.