Skip to main content

डोक्याला ताप नाही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 14/11/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याला ताप नाही आपण पैसे देवून वर्तमानपत्र खरेदी करतो ते काही आपल्याला मानसीक त्रास व्हावा म्हणून नाही. अगदी महत्वाच्या बातम्या देवून कोणाचे भले झाले आहे? सकाळमध्ये असल्या बातम्या वरचेवर यायला लागल्या आहे. वाचा : नितीशकुमारही बनले मांसाहारी. मागेही त्याने (सकाळने) 'लालू मांसाहारी बनले', राहूल गांधीने ईडली सांबर खाल्ले असल्या (बीपी न वाढवणार्‍या बातम्या) दिल्या होतात. आपल्या आरोग्याची काळजी करणारे आता फार वृतपत्रे (सकाळच नाही तर इतरही.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

ते मीठ खारे नव्हते

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 13/11/2009 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे का लोकही अमुचे मिंधे होती, स्वत्व विकुनी सारे? हे गरीबा शोषून फ़िरती मजेने, मिजास दाविती मारे का खावी आम्ही मीठ भाकरी?
काव्यरस

बेबेलप्लात्स : बर्लिनमधील पुस्तकांच्या होळीचे स्मारक

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 13/11/2009 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे, तरी पहिल्या भेटीत विसाव्या शतकाच्या भयाण इतिहासाचे सावट चहूबाजूला जाणवल्यावाचून राहात नाही. माझ्या प्रथम जर्मनी-भेटीत "उंतर देन लिंदेन" या बर्लिनच्या राजपथावरून फिरताना मी बघितलेले पहिले स्मारक म्हणजे बेबेलप्लात्स. दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे.

नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 13/11/2009 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस कसा साजरा झाला? नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील पहिल्याच दिवशी अबू मुळे जे रामायण घडले त्या रामायणाचे मुळ 'शपथ हिंदी भाषेत घेणे' हे होते. असे असतांना विधानसभेच्या अधिवेशनातील दुसर्‍या दिवशी कोणकोणत्या आमदारांनी मराठी सोडून (हिंदीत) शपथ घेतली हे कळाले तर कोणकोणते आमदार मराठीद्वेशी आहेत ते समजेल. त्यातल्या त्यात कलिना (मुंबई) तून विजयी झालेले कृपाशंकरसिंह यांनी कोणत्या भाषेत शपथ घेतली?

निकष

लेखक गुळांबा यांनी गुरुवार, 12/11/2009 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेने राडा करायला सुरुवात केल्यापासून बरेच जणांचा मराठी नावाचा बाणा जागा झाला आहे. महाराष्ट्रात अनेकजण आपण कसे कडवे मराठी आहोत हे दाखवत असतात. मला जर कोणी आपण कसे कट्टर मराठी आहोत असे सांगायला लागला की मी मान डोलवून म्हणतो, "वा वा ! तुम्ही मराठीप्रेमी आहात हे ऐकून बरे वाटले. मला सांगा - १) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का? २) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का?

आचार्य नाडीनंदाचा माडीबोध -

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/11/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, विसोबा खेचरांनी नाडीऐवजी माडी घालून विडंबनाची प्रेमळ विनंती करून बक्षिसाची चिकनची तंगडी समोर ठेवली होती. त्याचे पुढे काय झाले कळले नाही म्हणून हा नवा धागा टाकायचा अगाऊपणा. त्यांना जबरी वाटले ते इतरांनी चघळावे म्हणून पुन्हा डकवण्यची मुभा घेतली आहे.

सूहासचा जाहिर निषेध !!

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 12/11/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परममित्र सूहास यांनी नुकताच एक प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद इथे वाचता येईल. हा प्रतिसाद वाचुन अनेक तथाकथित विचारवंत तोंडघशी पडल्याचे समजते.