Skip to main content

बहिणाबाई- एक महान कवियत्री

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 05/12/2009 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहिणाबाई- एक महान कवियत्री मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवियत्री बहिणाबाई’,,,, जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात. घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्श

काळ.........

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 05/12/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
विचारामागे येती विचारं मन बिचारं थांबेचिना धाऊन दमले दमून थांबले असे काहीसे होईचना विचारं हेच अस्तित्व माझे परत्तत्व मला ठाउक नाही मनाबिनाच्या पलीकडले ते असे काहीसे असते काही...? असते नसते ठाउक नाही उगा कशाला मोहक भास उगा कशाला मनात अपुल्या "आहे- नाही" चा द्वंद्व समास कळी काळाची उलटी गिनती अंक अखेरचा ठाउक नाही श्वासही आहे चालू परंतू थांबेल कधी विश्वास नाही क्षणं आताचा निव्वळ संधी अहा , मिळाली व्हा आनंदी स्वप्न उद्याचे बघण्या मध्ये क्षण आताचा उगा दवडती समोर ठेवले ताट वाढूनी नको उद्याची चिंता चित्ती दिन संपला रात्
काव्यरस

पोखरलेली राजकीय व्यवस्था: डॉ आनंद तेलतुम्बडे यांचा लेख

लेखक कालिन्दि मुधोळ्कर यांनी शनिवार, 05/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी-अमराठी, मुम्बैचे तारणहार, थप्पड़-नाट्य ह्या सगळ्या शिमग्यानंतर आता कदाचित शांतपणे, विवेकीपणे महाराष्ट्राच्या सद्ध्याच्या स्थितीकडे पाहता येइल. दर पाच-दहा वर्षांनी फ्याशन बदलते आणि बर्याच वेळा जुनी फ्याशन रिसायकल होते. तितक्याच नकळत दर दहा-पाच वर्षांनी मराठी अस्मिता/हिन्दू धर्मावारचे संकट या सारख्या गोष्टी फ्याशन म्हणून सार्वजनिक पटलावर चमकतात. चार-दोन राडे होतात, गरीबांचे हाल होतात. दरम्यान साधे वाटणारे पण प्रचंड महत्वाचे प्रश्न तिथल्या तिथेच. राज ठाकरे, मधू कोड़ा आणि मनू शर्मा यांच्या घटनाबाह्य वर्तनाचा दाखला देऊन डॉ आनंद तेलतुम्बडे यांनी लिहिलेला लेख विचार करायला लावणारा आहे.

सेहवागचं काय करायच?

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 05/12/2009 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज सका़ळी मॉर्गनचा हा लेख वाचून आठवलं की आपण मागे एकदा सेहवागबद्दल एक लेख लिहिला होता पण तो मिपावर दिलाच नाहीये ! मी लिहिलेला लेख जुना आहे आणि तपशील त्यावेळच्या सामन्याबद्दल आहेत पण सेहवागचं 'तोडणं' हे स्थळ/काळाच्या पल्याड पोचलंय :) कालच क्रिकइन्फोवरही सेहवागबद्दल एक छान लेख वाचला.

अवघड वळणावर

लेखक स्वाती२ यांनी शनिवार, 05/12/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फॉल मधली शुक्रवारची दुपार. नेहमी प्रमाणे गाणी ऐकत माझी कामं उरकत होते. फुटबॉल सिझन. त्यातुन होम गेम. शेल्बीविल v/s रशविल. ६ वाजताच हादडून बाप-लेक गेमला जाणार . त्यामुळे संध्याकाळ्च्या जेवणाची तयारी जरा लवकरच करायला घ्यायाला हवी असे स्वतःलाच सांगत असताना स्कूलबसचा आवाज आला. ५ मिनिटांनी गॅरेज बंद केल्याचा, धाडकन दप्तर टाकल्याचा वगैरे नेहमीचे आवाज. पाठोपाठ खिदळतच लेक आत आला. "मॉम, आज काय झालं माहितेय." त्याला हसणं अनावर होत होते. मी नुसत्याच भुवया उंचावल्या. "It's just hilarious" कसबस एवढ म्हणुन स्वारी खुर्चीत लवंडली. पुन्हा हसण्याचा अ‍ॅटॅक. "हळू.

स्नोई...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/12/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता'च्या व्हिवा पुरवणीत (३ डिसें.०९) माझ्या नववीतल्या, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलीचा- सलोनीचा- हा लेख प्रसिध्द झालाय.) Picture 006 गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी आणि माझी बहीण-विदिशा- आम्ही दोघंही आई-बाबांच्या अगदी मागे लागलो होतो. एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणा म्हणून. शेवटी, सहा-सात महिन्यांपूर्वी बाबांनी तळहातावर धरून एक पपी आणला.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.

<शेवट>

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 04/12/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: बेसनलाडवाची ही मस्त गझल दात मग निखळून पडावा..लाथा खाता जोड नवा मापात मिळावा..लाथा खाता घोळत फिरतो तुझ्याभोवती दिवसाढवळ्या चपलेचा तरि सहवास घडावा..लाथा खाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का चेहरा सुजवला..लाथा खाता? नेहमी होते स्वप्नांमध्ये भेट आपली तिथेही सँडल, क्षण दुजा नसावा..लाथा खाता लाथ वाढली नशिबाने, भरपेट जेवलो तुझी खळी मुखशुद्धीसाठी..लाथा खाता बोलघेवडा स्वभाव माझा तुझा न पटला मुक्यानेच हा शेवट व्हावा..लाथा खाता

वेडा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 04/12/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक एस.टी 'स्टँडवरचा माणूस' मळलेली चड्डी , मळकट अन तेलकट असा लांबसा सदरा, विस्कटलेले केस, दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला.... स्वता:शीच काहीतरी बोलत असतो, कधी झाड , कधी पक्षी ,कधी प्राणी कोणाबरोबरही तो बोलत असतो, प्रत्येकात तो स्वतःच्या कुठल्यातरी नातलगाला शोधत असतो... अन हो त्याच्याकडे एक चिंध्याचे गाठोडे पण आहे, त्यातल्या तो काही चिंध्या काढतो , काही फेकुन देतो , काही फाडतो, काहींच्या गाठी मारतो, काही नवीन शोधुन आणुन त्यात परत भरतो, हिच त्याची दिनचर्या.... त्याला सगळेच वेडा म्हणतात का कोणास ठावूक ? मीही स्वता:शीच बोलत असतो तासनतास.. कुठल्याही माणसात शोधतो की मी पण मित्र ,नातलग, प्रेम... मा

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 04/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे. सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही.