Skip to main content

काळ.........

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 05/12/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
विचारामागे येती विचारं मन बिचारं थांबेचिना धाऊन दमले दमून थांबले असे काहीसे होईचना विचारं हेच अस्तित्व माझे परत्तत्व मला ठाउक नाही मनाबिनाच्या पलीकडले ते असे काहीसे असते काही...? असते नसते ठाउक नाही उगा कशाला मोहक भास उगा कशाला मनात अपुल्या "आहे- नाही" चा द्वंद्व समास कळी काळाची उलटी गिनती अंक अखेरचा ठाउक नाही श्वासही आहे चालू परंतू थांबेल कधी विश्वास नाही क्षणं आताचा निव्वळ संधी अहा , मिळाली व्हा आनंदी स्वप्न उद्याचे बघण्या मध्ये क्षण आताचा उगा दवडती समोर ठेवले ताट वाढूनी नको उद्याची चिंता चित्ती दिन संपला रात्र जहाली मिटणे डोळे अपुल्या हाती असेल जर का बात उद्याची येईल आपणा पुन्हा हकाटी .............. लिंबोणीच्या झाडा मागे काळ लपला गं बाई आज माझ्या आत्म्याला जाग कारे येत नाही......!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1570
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया