Skip to main content

शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 19/12/2009 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे घ्या वाचकहो, शेवटी न राहवून एक विडंबन पाडलंच. प्रेरणा कृष्णकमळ मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद जन हे टवाळ मेंदूही गहाळ दंगा न कल्लोळ दंग दंग सजल गरळ निबंध बरळ न कोणी सरळ अंगी कळा अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे
काव्यरस

अगा देवराया | अम्हा खेव द्याया |

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 19/12/2009 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
अगा देवराया | अम्हा खेव द्याया | धरिसी या काया | पांघरोनी || कितिक विभूति | सर्वत्र जगती | धरियेल्या वृत्ती | नानाविध || कुणा शालजोडी | कुणासी गोधडी | कुणी ठिगळ जोड़ी | दारिद्रयाचे || कुणा मुखी साय | कुणी साही हाय | कुणा पोटी पाय | क्षुधार्तेने || कुणा पुष्प शय्या | कुणा काटे पाया | कुणा चालावया | पाय नाही || असुनी अनाथ | कुणा प्रेम छत्र | कुणा हाल मात्र | स्वगृहीचे || नाना परी अश्या | होती जीव दशा | सोसताती कैश्या | लेकरे ही || असती का सारी | रुपे नाना परी | हरी लीला करी | मूढ़ आम्ही || तूचि घेसी सुख | सोशिसी तू दु:ख | राव आणि रंक | तूचि होसी || ऐश्या नाना कळा | दावितो सकळा | स्वस्थ ह

हरी हे दयाळा कधी भेट देशी

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 19/12/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
हरी हे दयाळा कधी भेट देशी | उभे भक्त सारे तुझ्या पायरीशी | जैसा रवी ये घनान्धारातुनी | तैसे कधी श्री मुख दाखविशी | उभ्या धेनु वत्सासवे रान वाटे | गोपाळ मेळा दारात दाटे | सर्वास रे भेटुनी निवविशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | संगे तुझ्या रे मन हारपते | संगे तुझ्या रे चित्त निर्वाण होते | मायाजलाब्धी आम्हा पार नेशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | हरी सर्व चिंता तुला वाहियेल्या | तुझ्या पुष्पमाला आम्ही धारियेल्या | निमिषात सा-या चिंता हरिसी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | मुखे गोड ऐसे तुजे नाम घेऊ | स-देही इथे सर्व वैकुण्ठ पाहू | नामात तुझिया अम्हा प्राप्त होशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी

हेमलकसाच्‍या अरण्‍यातील 'मंदाकिनी'

लेखक मड्डम यांनी शनिवार, 19/12/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
- विकास शिरपूरकर मध्‍यप्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्‍योत्‍सव समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा देवी अहिल्‍या पुरस्‍कार लोक बिरादरी प्रकल्‍पाच्‍या संचालिका आणि मॅगसेसे पुरस्‍कार विजेत्‍या डॉ.मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला असून दि.20 डिसेंबर रोजी एका भव्‍य कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार दिला गेला. एक लाख रूपये रोख, मानपत्र आणि श्रीफळ असे पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. या पुरस्‍काराच्‍या निमित्ताने मंदाताईंशी साधलेला हा मनमोकळा संवाद... ''1970-72 चा तो काळ असावा.

या चाफ्याचं काय करू ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/12/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
(आमची प्रेरणा - एक प्लान.... खुनाचा : http://www.maayboli.com/node/12190 ) "च्यायला विशल्या, पण जाम तंतरली होती रे माझी. सॉलीड घाबरलो होतो. ऐनवेळी माझ्यातल्या रहस्यकथा लेखकाने हात दिला म्हणून थोडा सावरलो. त्यात चाफ्याच्या ' त्या कॉलने' कृपा केली आणि मी कसंबसं धीर एकवटून तो फटका मारला." हातातला कॉफीचा कप खाली ठेवत कौतुक स्वतःशीच हसला आणि मी खुसखुसायला लागलो. "हसा लेको, तुमचं काय जातय हसायला? एक जण काहीतरी प्लान करतो, दुसरा नशिबानं त्यातुन वाचतो आणि मधल्या मध्ये प्लान एक्झिक्युट करणार्‍या माझा मात्र बळी.

विरोधाभास..

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 18/12/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
खूप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दूर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदूर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. इथल्या सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आज पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामेजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मढ्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही.. उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवेमध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे.

`स्टोरी'चं `नवं पान'...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 18/12/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं अस्तित्व `आपल्या जगा'पासून केव्हाच वेगळं झालंय...36 वर्षांपूर्वी जिवंतपणाच्या सगळ्या संवेदना हरवलेली अरुणा शानभाग सध्या पुन्हा चर्चेत आली असली, तरी त्या चर्चेचे वारे तिच्या आसपासदेखील पोचलेले नाही... `ती जिवंत आहे', एवढंच `केईएम'चे वैद्यकीय अधिकारी सांगतात. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तिचं एकटेपण आणखी `कडेकोट' झालं आहे... `केईएम'च्या एका निर्जन कोपऱ्यातल्या `बेड'वर एकाकीपणे तिची देखभाल करणारे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी वगळता, अन्य अनेकांना ती कुठे आहे हे माहीतदेखील नाही...

चीझ स्कुअर्स

लेखक fulpakharu यांनी शुक्रवार, 18/12/2009 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
From Untitled Album" alt="" />साहित्य बेसिल १ जुडी (१५ - २० मध्यम आकाराची पाने) पुदिना १/२ जुडी (१५/२० पाने) कोथिंबीर १ जुडी २ टेबल स्पून ऑलिव ऑइल पेपर जॅक चीझ १ बार ४/५ हिरव्या मिरच्या

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 18/12/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.