हरी हे दयाळा कधी भेट देशी
हरी हे दयाळा कधी भेट देशी | उभे भक्त सारे तुझ्या पायरीशी |
जैसा रवी ये घनान्धारातुनी | तैसे कधी श्री मुख दाखविशी |
उभ्या धेनु वत्सासवे रान वाटे | गोपाळ मेळा दारात दाटे |
सर्वास रे भेटुनी निवविशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |
संगे तुझ्या रे मन हारपते | संगे तुझ्या रे चित्त निर्वाण होते |
मायाजलाब्धी आम्हा पार नेशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |
हरी सर्व चिंता तुला वाहियेल्या | तुझ्या पुष्पमाला आम्ही धारियेल्या |
निमिषात सा-या चिंता हरिसी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |
मुखे गोड ऐसे तुजे नाम घेऊ | स-देही इथे सर्व वैकुण्ठ पाहू |
नामात तुझिया अम्हा प्राप्त होशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |
-- सागर लहरी २८-१०-२००९
लेखनविषय:
याद्या
1387
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
सुंदर
सागर, काय
सुंदर भक्ती रचना