अप्रेझल
ऑफिस मधील अप्रेझलच्या मोसमात आपल्यासारखाच मार खाल्लेला दुष्काळग्रस्त मित्र लाभणे यापेक्षा दुसरे भाग्य नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मी माझ्या अशाच एका मित्राला फोन लावला.
"हॅलो. काय रे, काय सुरु आहे?" मी.
"काही नाही रे. तू बोल." तो.
सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा काहीही म्हणा पण अशावेळी दोघांनाही बरोबर माहित असते की आता कोणता विषय निघणार आहे ते.
"आज रेटिंग समजले आणि डिसकशनपण झाले." मी सांगून मोकळा झालो.
"मला 'गुड' दिलयं आणि डिसकशन उद्या होईल." त्याने आपली पाने टेबलावर टाकली.
"सेम हिअर. मला पण तेच. आऊटस्ट्यांडींग, एक्सलंट, गुड, आणि अॅव्हरेज या क्रमाने गेलो तर 'गुड' म्हणजे 'बॅड' आहे.
मिसळपाव