मागे ठाण्याला " मिपाकट्टा " जमला होता . त्यावेळेस मनात असुनही जाता आले नाही. कारण त्यावेळी मी कामावर होतो.
आणि काम सोडुन जाणे जमले नाही. त्यावेळी मोबाइलवरुन मी सगळ्यांची विचारपुस केली होती.
या वर्षी म्हणजे " मकरसंक्रांतीनिमित्त " पुण्यातील "मिपाकरांना " एकत्र येणे जमेल काय ?
मला दि. १७ जानेवारी ही तारीख योग्य वाटते. शिवाय "रविवार " असल्याने बहुतेकांना सुट्टी असेलच
मला वाटतं पुण्यातील "बालगंधर्व रंगमंदिरा मागील कफेटेरियात " जमुन तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम करावा
संध्याकाळी ६ वाजता तेथे जमणे सोइचे होइल असे मला वाटते.
तरी क्रुपया पुण्यातील " मिपाकरांनी " आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. त्यानिमित्ताने माझी इतरांशी ओळख होइल.
जमलतर तिथल्याच मिसळपावाची चव चाखता येइल.
" आपला हरकाम्या "
आपण माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधु शकता माझा भ्रमणध्वनी क. ९९२२९९४९३७ हा आहे.
वाचने
1451
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेंगळुरकर