पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा आणि बिचारे पुरुष, मुलगे आणि वृद्ध
--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे.
(स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा)
पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा-
(१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून.
मिसळपाव