Skip to main content

तुका म्हने एसे नरा ........

लेखक गजा गाजरे यांनी गुरुवार, 18/02/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
अशोकराव चव्हान हे बाइला ( दिल्लिवालि) कुथ सापड्लय कुनास ठाउक माग एकदा यान घोशना केलि सगळ्या टयाक्सि वाल्याना मराठि अलच पहिजे अनि मुम्बै भर बोम्बल्त सुट्ल बाइ चि करडि नझर म्हाराश्टत्रा वर पडलि अनि बाइ ने हातात्लि दोरि खेच्लि , हे बेन परत म्हआ करत खुरचित येऊन बसल अनि पुन्हा हवा गेल्यगत गप झाल . मराठि वलयनि पुन्हा खाना वर हल्ला केला चव्हानाचि परत गोचि झालि अनि यानि खानाचे जोडे धरले , एकच राडा झाला . बाइ पुन्हा तापलि , हिच उनाड पोरग भारतभर उकिरड्रे हुन्गत फिरत होतच . त्याला हिकड पिटाळ्ल . ते अपल बोम्ब्ल्त पुन्हा इकड आल . मुम्बई भर फिरल . अनि अशोक्ला कोपच्यात घेउन जोडे काढ्ले .

फुले आणि फुलपाखरे

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 17/02/2010 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी ऑफिसमधून येताना माझा सहकारी मित्र प्रदीप मला म्हणाला "अरे मनिष, मलाव तलाव मध्ये मी कमळे फुललेली बघितली. " हा मलाव तलाव म्हणजे आमच्या घरापासून १ ते १.५ किलोमीटर दूर असलेली एक पाणथळीची जागा. त्याच्या भोवती एक बगिचा बनवलेला. जॉगिन्ग साठी सोय केलेली. आता इतक्या जवळ असलेल्या जागी फुललेली कमळे बघायची सन्धी मिळते आहे म्हटल्या वर आम्ही ठरवले की रविवारी सकाळी उठून तिकडे जायचे. एरवी रविवार म्हणजे झोप पूर्ण करण्याचा दिवस. पण त्या रविवारी सकाळी साडे सातला आम्ही घराबाहेर पडलो. मलाव तलाव ला पोहोचलो. तिकडच्या रखवालदाराला सान्गितले की आमहाला काही फोटो काढायचे आहेत.

हे खरं आहे?

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 17/02/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला असं कळले की अमेरीकेत गर्भलिंगनिदान हा भारतातल्या प्रमाणे गुन्हा नाही... ही माहिती प्रथमच कानावर आल्याने खरी की खोटी ते जाणून घेण्यास उत्सूक आहे.

सुरक्षेचा घोळ

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 17/02/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
सुरक्षा कोणाची, कशी, केव्हा, कोणाच्या पैशाने? सगळा घोळ. सध्या घडत असलेले सुरक्षेचे एक नाटक वाटते. बेजबाबदार मीडिया २४ तास बातमी ह्या नावाचा काय दुरुपयोग आणि घोळ घालते आहे ते बघताना सुरक्षा कशाला म्हणतात हे कळेनासे झाले आहे. वरळी सी लिंक किती व कशी असुरक्षित आहे, त्या करता किती दिवसात कोणती साधने बसवण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे ..... ही बातमी म्हणून जगाला सांगणे. . . . बिनडोक, बेजबाबदार.... सगळे चीड आणणारे. ऐन वेळेवर मोठी किंमत देऊन सबस्टॅंडर्ड काहीतरी बसवून घोळ घालणे व खिसे भरणे .... हे किती वेळा घडले, घडणार? बुलेटप्रुफचा घोळ अजून निस्तरला नाही तोवर दुसरा घोळ सुरू झाला.

हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट

लेखक चिर्कुट यांनी बुधवार, 17/02/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर लिहिण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. सर्व जुन्या जाणत्यांनी चुका सांभाळून घ्याव्या ही विनंती.
हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट
साधारणपणे ऑगस्ट एन्डचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस. 'कुमार विद्यामंदीर,हुपरी-शाळा नं. 1' मधील तिसरी-ब चा वर्ग. मुलांना "प्रश्नोत्तरे लिहा रे", असं सांगून अलाटकर गुरुजी निवांत पान खात बसले होते. त्याच वर्गात एका कोप-यात अस्मादिक मित्रांबरोबर 'चिंचोके' खेळण्यात गुंतले होते. B) इतक्यात वर्गात 'ऊSSSSSSS' अशी आरोळी उठली. पाहातो तर शिपाईमामा नोटीस घेऊन आल्याचा तो आनंद होता.

पाव (हमखास - भारतातल्यासारखा + फोटो)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 17/02/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर मिसळीच्या अनेक कृती दिसल्या पण पाव कसा करायचा याची एखाद-दुसरीच दिसली. अर्थात तुम्ही भारतात राहात असाल तर भाग्यवान आहात - या कृतीकडे सरळ डोळेझाक करा व बेश जवळच्या उत्तम बेकरीतून ताजा पाव आणा. पण अमेरिकेत राहाणार्‍या आम्हा दुर्भाग्यांना तसा उत्तम पाव मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आंतर्जालावर मिळणार्‍या कृतींमध्ये खूपच कमतरता असतात हे मी अनुभवाने जाणले. गेल्या दोन महिन्यात वीस ते पंचवीस वेळा पाव करण्याचा प्रयत्न करून (त्यात काही विटाही झाल्या !) शेवटी ही नक्की केली. इंजिनीअरींगच्या प्रोसेस ऑप्टिमायजेशनच्या ज्ञानाचा इथे फार उपयोग झाला.

गुलाबफुलाचा गाभा

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 17/02/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर मिपा वर फोटो चढवून बघण्याचा हा प्रयत्न आहे. खाली चढवत आहे एक फोटो गावठी गुलाबाच्या गाभ्याचा.

ओरेगनचा समुद्र किनारा

लेखक amitbapat यांनी बुधवार, 17/02/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरेगनच्या समुद्रकिनाऱ्यावर एकदा हायकिंगसाठी गेलो होतो. तेव्हा काही फोटो काढले, त्यातलाच हा एक. आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.

<फालतू धागे आणि विडंबने>

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 16/02/2010 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात? तो - नाही ती - अरसिक कुठचा! तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;) ती - चूप्प . एकदम चूप्प!! तो - तुला कुठे विडंबने आवडतात? ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं? तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं ती - तुझी विडंबने लई खवट आहेत. तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत? तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :) ती - अजून काही?