"जान्हवी"-- पुस्तक परिचय.
पुस्तकः जान्हवी
लेखकः वि. वा. शिरवाडकर
प्रथम आव्रुती: १९५२
प्रकाशकः कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमतः 50.00
परवा घरी थोडा वेळ मिळाला आणी बर्याच दिवसापासुन पडुन राहीलेले "जान्हवी" हातात घेतले. त्याआधी एकदा तीसेक पाने वाचली होती, पण परवा एका दमात पुस्तक वाचुन संपले (संपवावे लागले)
वि. वा. शिरवाडकरांचे माझ्यासाठी पहिलेच पुस्तक आणी प्रथम आव्रुती १९५२ ची, त्यामुळे वाटले कि काहीतरी जुनाट वाचायला मिळेल, पण शेवटचे पान वाचुन पुस्तक ठेवले त्यावेळी डोक सुन्न झाले आणी तो विचार गळुन पडला
हि कथा मुख्यतः तिन व्यक्तीभोवती फिरते. वसुदेव, महंत आणी जान्हवी.
मिसळपाव