Skip to main content

चाराणे कमी !!

लेखक टारझन यांनी शनिवार, 15/05/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :- खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे.

थुंकी

लेखक वडापाव यांनी शनिवार, 15/05/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधी सहन करता येत नसे, पण आता सवयच झालीय. भारतात एक अब्ज माणसे आहेत. त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात. कोणाच्या थुंकीत कफ असतो, कोणाच्या थुंकीत तंबाखू, पान मसाला, तर कोणाच्या थुंकीत सगळ्याचं एकत्रित मिश्रण! मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बोरीवलीवरुन ट्रेन पकडतो. किती वाजता कुठे जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ऐवजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनीटांनी उशिरा येणार आहे हे सांगितल्यावर किंवा सांगायच्या आधी "" यात्रीयोंसें निवेदन है कि वे कृपया इधर उधर ना थुंके. थुंकनेसे बिमारी फैलती है.

कळकळीचे आवाहन - मदत

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 15/05/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणिंनो, तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात. ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे. मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे. क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या. मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे. तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन. तुमची, (कश्टकरी) चुचु

कोकणातले `केरळ'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/05/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल...

नांदी

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 15/05/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी (सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी) काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी' पाठमोर्‍या आकृतीला पाहुनि उद्गारले 'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती
काव्यरस

अबोल प्रीत

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 15/05/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती! मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती! रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती! अधरांच्या उंबर्‍यात नाव तुझे का अडते? अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते? लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
काव्यरस

ती चिडली तेव्हा भीषण

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 15/05/2010 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता