राम राम मायबाप मिपाकरहो,
'इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...' हे असं झालंय बघा मिसळपावचं. मला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी आणि नीलकांतने या संकेतस्थळाच्या उभारणीस प्रारंभ केला. तेव्हा आम्ही दोघे आणि आमचे काही हितचिंतक एवढेच लोक होतो. नीलकांत तेव्हा उमेदवारीच्या दिवसांत होता. स्वतःचा संगणकही नाही अशी त्याची अवस्था. त्या काळात या मुलाने अक्षरशः नेट कॅफेत बसून या संस्थळाच्या उभारणीचे काम केले. यशस्विरीत्या संस्थळ चालू झाले. 'लोग मिलते गये कांरवा बनता गया' अशी मिपाची वाढ उत्तरोत्तर होत गेली.