नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून
किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-)
ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत.
तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.
मिसळपाव

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.
मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता.