Skip to main content

वांग्याच भरीत

लेखक गणपा यांनी गुरुवार, 17/06/2010 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ? जर अजुन ठरल नसेल तर हा झटपट होणारा पदार्थ कसा वाटतोय? साहित्यः १ भल मोठ्ठ वांग. १ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन. २-४ चमचे भाजलेल्या दाण्याच कुट.

रोहिडा

लेखक sandeepn यांनी गुरुवार, 17/06/2010 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा रोहिड्याला गेलो होतो पण खुप पाऊस आणि अंधार यामुळे किल्ला पुर्ण न सर करताच परत आलो होतो. परतलो पण परत येण्याचा निश्चय करुनच.
एकदा कार्यालयातील हौशी लोकांनी रोहिड्याला जाण्याचा प्लॅन बनवल्यानंतर पुन्हा एकदा रोहिडा मला साद घालू लागला व मि जान्याचा निश्चय केला. मग नेहमिप्रमाने इ-मेल्स फ़ॉरवर्ड झाल्या.

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

आई....नारायण सुर्वे

लेखक अस्मी यांनी गुरुवार, 17/06/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक कविता ऐकण्यात / पाहण्यात आली. मूळ हिंदी असलेल्या या कवितेचं कवी नारायण सुर्वे यांनी मराठी रुपांतर केलं...ही जितेंद्र जोशीने एका कार्यक्रमात सादर केली होती. तो एकदा सातार्‍याला एका भटक्या विमुक्त मुलांसाठीच्या शाळेत गेला असताना एका मुलाने ही कविता त्याला ऐकवली... :) हंबरून वासराले... हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले ... आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा, दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा, पिठामंदी.....

गीत: गरमी चा आलाय उन्हाळा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/06/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
गरमी चा आलाय उन्हाळा
गरमी चा आलाय उन्हाळा उन काय सोसवेना तगमगीची काहीली आली उपाय काही तरी करा ना || गारगार वारं अंगाला नाही लागत आता घामाच्या धारा सुटल्यात जीव घाबरा होई निसता उगाच बोलन्यापरीस पंख्याची हवा मला घाला ना || आंबट चिंबट खाऊ वाटते पन रानात एकटी जावून करवंद, जांभळं, आंबा अन कैर्‍या पाडायची भिती मला वाटते रानचा रानमेवा लुटायला सोबतीला बरोबर तुम्ही या ना || - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०६/२०१०

(पोटभर जेवणासोबत एक चमचमीत दिवस: काही सुचतंय?)

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/06/2010 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही उपयोगी धागे काढले म्हणून कौतूक केले त्यामूळे जाहीर आनंदून मी हा धागा काढत आहे. तसे माझ्यासमोर इतरही पर्याय होते! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला नाही आहे असे नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग खावू घालायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे.

गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?

लेखक सोम्यागोम्या यांनी गुरुवार, 17/06/2010 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते.

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

लेखक प्रमोद देव यांनी गुरुवार, 17/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज १७ जून. आपल्या हाती आमचा हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का. कळावे आपला स्नेहांकित प्रमोद देव