गीत: गरमी चा आलाय उन्हाळा

पाषाणभेद जे न देखे रवी...
गरमी चा आलाय उन्हाळा
गरमी चा आलाय उन्हाळा उन काय सोसवेना तगमगीची काहीली आली उपाय काही तरी करा ना || गारगार वारं अंगाला नाही लागत आता घामाच्या धारा सुटल्यात जीव घाबरा होई निसता उगाच बोलन्यापरीस पंख्याची हवा मला घाला ना || आंबट चिंबट खाऊ वाटते पन रानात एकटी जावून करवंद, जांभळं, आंबा अन कैर्‍या पाडायची भिती मला वाटते रानचा रानमेवा लुटायला सोबतीला बरोबर तुम्ही या ना || - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०६/२०१०
वर्गीकरण

0 टिप्पण्या 1,532 दृश्ये