Skip to main content

'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 06/07/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे महिन्यापूर्वी 'जकार्ता पोस्ट'मध्ये 'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख आला होता. शीर्षक होते, "As Pakistan stares at India, India eyes the world". हा लेख 'मिपा'कर http://www.reuters.com/article/idUSTRE6590YJ20100610 या दुव्यावर वाचू शकतील. आपण भारतीय नागरिक परदेशी मीडियात भारताबद्दल साधारणपणे तुच्छतादर्शक मतप्रदर्शन वाचतो व रागावतो.

लिएंडर पेसचे १२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 06/07/2010 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप फुटबॉलच्या रणधुमाळीत आपल्या (सुद्धा) नजरेतून एक महत्त्वाची बातमी सुटली म्हणायची! आपला लिएंडर पेस आणि झिम्बाब्वेची कॅरा ब्लॅक ह्या द्वितीय मानांकित जोडीने दक्षिण आफ्रिकेचा वेस्ली मूडी आणि अमेरिकेची लीसा रेमंड ह्यांचा ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्स मध्ये पराभव करून २०१० चे विम्बल्डन मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. पेसचे हे सहावे मिश्र दुहेरी तर एकुणात १२ वे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद आहे.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई (राजमाता जिजाउंचे पुण्य स्मरण )

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 06/07/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई :- माता महान कितीही झाल्या संसारी | दिव्य चरित्र परी तुझे त्या तुलना नाही | माते अंबे भवानी नमितो जिजा बाई | पुनश्च शिव भारत घडण्या उद्धारा येई || भ्रमली रयत हि सारी भुलली अभिमाना | भ्याले जन-पती सारे पहावया रणा | स्वार्थी मदांध होऊन भुलले शिव राणा | माते तुजवाचून आता स्मरावे कोणा || जन हे समस्त वानिती शिवबा परतावा | छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ? हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा | धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा || -- सागर लहरी ०६-०७-२०१०

जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा)

लेखक डोमकावळा यांनी मंगळवार, 06/07/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर) 'तोयोसू' नावाच्या टोकियोच्या एका उपनगरा पासून काहीशा अंतरावर असणारे 'ओदायबा' नावाचे एक ठिकाण. ओदायबा हे जपानच्या समुद्रावर वसलेलं उपनगर. खर तर वसलेलं म्हणण्यापेक्षा समुद्रावर अतिक्रमण करून वसवलेलं कृत्रीम बेटच. टोकियो आणि ओदायबा हे 'रेनबो ब्रिज' (Rainbow bridge) नावच्या मोठ्या आणि सुंदर पुलाने जोडले गेले आहेत.

भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/07/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो. भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्‍याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच.

||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल आधूनिक मिपाप निती कथा एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल.