Skip to main content

जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 10/07/2010 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे. ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील? सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे? मराठी म

टंकेल वीडंबक जैं न काहीं

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 09/07/2010 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा!
काव्यरस

पुन्हा एकदा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 09/07/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs
काव्यरस

इराण, इस्लाम आणि दगडाने ठेचून मारण्याची कायदेशीर शिक्षा

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 09/07/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
इराणमधे सकिने मोहम्मदी अश्तियानी (मराठी उच्चाराबद्दल संभ्रमित) ह्या चाळिशीच्या महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा तिथल्या न्यायालयाने दिली होती. मानवाधिकारवाल्या लोकांनी जगभर रान उठवल्यामुळे ती शिक्षा रद्द झाली. ह्या बाईंना व्यभिचारी म्हणून ही शिक्षा दिली गेली. तिला ९९ फटक्यांची शिक्षा आधीच देऊन झाली आहे. संबंधित प्रकारात दुसरी व्यक्ती (बहुधा पुरुष) हिला काय शिक्षा मिळाली ते कळत नाही. मराठी वृत्तपत्रात याविषयी फारसे काही आलेले आढळले नाही. माझे मतः ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो.

काय करावे?

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 09/07/2010 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील एक एमआयडिसी छोटा कारखाना थोडी फार मशिनरी. इंजिनियरींग जॉबवर्क्स ची कामे घेवुन ती पुर्ण करणारा उद्योजक. कारखाना सुरु होवुन दोनच वर्षे झालेली. पीएफ इएसआयसी केवळ कायम कामगारांना. कायम कामगार मोजुन ८. जादा कामाचे पैसे मिळतात. त्यांचा पगार वेळेवर. हा मुद्दा नाही बाकी १०-१२ तात्पुरते, १२-१५ कॉन्ट्रॅक्टरची. कॉन्ट्रॅक्टरला २५० रु माणशी, अधिक ओटी वगैरे दिले जातात. तो त्यातले १५ टक्के कापुन कामगारांना देतो. हा पण मुद्दा नाही तात्पुरते गेटवर कधी काळी आलेले. भरलेले. दिवसाला १२५ ते १७५रु. १२ तास काम. महिन्यातले २५ दिवस. जादा कामाचा हिशोब नाही. १२ तास ड्युटी.

मीरा म्हणे ...........

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 09/07/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मीरा हसुनी सांगे राधेला रोजच भेटे श्रीहरी मजला हेवा मी करू तरी कसला तो माझ्यातच भरुनी उरला सकाळी माझ्या शेजेवरी सूर्यकिरण बनुनी येतो अल्लड उधळीत उषा लाडिक चाळा तो करितो स्नानासाठी मी जाता माझ्यास्तव तो जल होतो मी माळंता फुले सुगंधी तोच तयातुनी परीमळतो गंध उगळता त्याच्यासाठी चंदन बनुनी तो झिजतो माला गुंफता जाईची तो सूत्र म्हणुनी वावरतो मी नेसता वस्त्र रेशमी तो तयातील मार्दव बनतो मी करिता शृंगार दर्पणी तो सौंदर्य माझे होतो मी छेडीता वीणा विरागी तो तारांचे अंतर बनतो पायी बांधता मी घुंगरू नादमधुर तो झंकारून उठतो रात्री माझ्या गवाक्षातुनी चंद्र बनुनी पाझरतो नक्षत्रांचे
काव्यरस