Skip to main content

एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/07/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या. सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 14/07/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

लेखक बद्दु यांनी बुधवार, 14/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे? क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत.. धन्यवाद.

मासे ८) बोईट

लेखक जागु यांनी बुधवार, 14/07/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर बोईट मोठे असतील तर त्याचा शेपटाकडील भाग , डोके आणि मधला भाग असे तिन भाग करावेत. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधला भाग तळण्यासाठी वापरावा. जर छोटे असतील तर दोन तुकडे किंवा अख्खेच ठेवावेत.

स्वप्नी माझ्या आलीस तू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/07/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०
काव्यरस

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/07/2010 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे. आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे. कळावे. -संपादक मंडळ हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत.

कोरीगड

लेखक येडाखुळा यांनी बुधवार, 14/07/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडा का होइना, पाऊस झाल्यामुळे आम्ही कोरीगड किंवा कोराईगड येथे नुकतेच जाऊन आलो. तिथली काही छायाचित्रे येथे डकवत आहे. लोणावळ्याच्या पुढे अ‍ॅंबी व्हॅलीला जो रस्ता जातो त्या रस्त्याने जात राहिले की पेठ शहापूर हे गाव लागते. तेच पायथ्याचे गाव आहे.गड चढायला अगदीच किरकोळ आहे.