'किल्ले जंजिरा': तिथले तथाकथित गाइड आणि त्यांचं ज्ञान!
नमस्कार मंडळी!
किल्ले जंजिरा इथला एक अनुभव 'शेअर' करतो...
काही दिवसांपूर्वी जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. बरोबर कंपनीमधले मराठी/अमराठी, किल्ला पुर्वी बघितलेले / न बघितलेले असे लोक होते. मी हा किल्ला तिसरयांदा बघत होतो. पण यावेळी बरेच जण होतो आणि होडीवाल्याने 'गाइड' बनायची तयारी दाखवली म्हणून पहिल्यांदाच 'गाइड' घेतला.
आणि आमची 'गाइडेड टुर' सुरु झाली. गाइड बर्यापैकी माहिती देत होता. किल्ल्याचा उल्लेख वारंवार 'अजिंक्य' असा करत होता. मला ते थोडं खटकलं, पण म्हटलं ऐकू तर काय काय सांगतोय....
नंतर त्याने शिवाजी, संभाजी यांनी किल्ला जिंकायचे केलेले अनेक अयशस्वी प्रयत्न इ.
मिसळपाव
२
३
४
