Skip to main content

***काही क्षण दिवाळीचे***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 06/11/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( ) फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी.

पिम्पळ्पान

लेखक जयदेव यांनी शनिवार, 06/11/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीन्चा उमाळा दाटून आला की मन गहिवरते आणि चक्षू आसवान्ना वाट मोकळी करुन देतात. कोरड्या ओठाण्वरुन जिभ फिरवतान्ना आसवान्ची खारट चव कळताच मन अजुनच हळवे होते. डोळ्यात तरन्गणार्‍या त्या आसवान्च्या पाझरामुळे वर्तमान धूसर होवून सयीची साय मेन्दूत घट्ट होत जाते. मनचक्षू स्वैर होतात नी अन्तर्मनाचा ताबा घेवून हृदयाला आक्रोशाच्या खाईत लोटतात. हॄदयाची स्पन्दने वाढतात की ते निपचीत होतात हे कळायच्या आतच एक पिम्पळपान डोक्यावर पडते आणि आठवणीने ताणलेल्या मनपतन्गाच्या दोर्‍याला थोडी ढिल मिळते.

घोषणा झाली...

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 06/11/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
घोषणा झाली मला फेटाळलेली... 'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली माणसे झाली पहा आता शहाणी फार पूर्वी भोवती घोटाळलेली पालवी कोठे नसू द्या फार मोठी आणि ती नक्की नको नाठाळलेली एकही अश्रू दिसेना आज कोठे गोष्ट होती आजही रक्ताळलेली नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे जातसे जत्रा पुढे वाचाळलेली मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....? जीवने बनवा नशा फेसाळलेली..! खोल आहे मी समुद्रासारखा; पण... आजही देतो उन्हें गंधाळलेली फायदा नसतो उधारी फेडण्याचा माणसे गेल्यावरी सांभाळलेली आजही गावाकडे लज्जा दिसावी... जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..! टेकला माथा जिथे, तेथेच फुटला... जीवनें इतकी कशी खडकाळलेली..? एकदा ना एकदा होतील

दिवाळी अंकांतील फराळ

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 06/11/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती. आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला?

अभंगः विठ्ठल उभा विटेवरी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 06/11/2010 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
विठ्ठल उभा विटेवरी भक्ताचीये वाट पाही ||धृ|| पुंडलीक लावी भक्तां मार्गा कर्म करण्या सोडी योगा तरची पावें प्रेमे देवा विठ्ठल पुंडलीक एकची राही ||१|| नामजप करता विठ्ठल अवघे हरपले भान कोण विठ्ठल कोण भक्त दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/११/२०१०
काव्यरस

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/11/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.