अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
लेखनविषय:
काव्यरस
अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
विठ्ठल उभा विटेवरी
भक्ताचीये वाट पाही ||धृ||
पुंडलीक लावी भक्तां मार्गा
कर्म करण्या सोडी योगा
तरची पावें प्रेमे देवा
विठ्ठल पुंडलीक एकची राही ||१||
नामजप करता विठ्ठल
अवघे हरपले भान
कोण विठ्ठल कोण भक्त
दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/११/२०१०
वाचने
2527
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
अभंग आवडला.
अवांतर- वॉशिंग्टनच्या विठोबाचे आगमन आणि आपला अभंग, योग जुळून आलाय.!
दुसरे कडवे आवडले. :)
नामजप करता विठ्ठल
अवघे हरपले भान
कोण विठ्ठल कोण भक्त
दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२||
एकदम मस्त...!
मस्तच