कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप -१
मारुतीच्या शेपटी सारखा वाढतच चाललेल्या लॉकडाऊन कालावधीचा फारच कंटाळा आलेला असतानाच्या काळात मिपावर दुर्गविहारी ह्यांची गोव्यातल्या किल्ल्यां बद्दलची सुंदर माहितीपुर्ण लेखमालिका आणि गोरगावलेकर ताईंची कोकण व तळ कोकणातल्या भटकंतीची मस्त मस्त प्रवासवर्णने वाचून असे काही टेम्पटेशन आले होते की ह्या आधीच्या कोकण-गोवा भेटींमध्ये तिथल्या अनेक बघायच्या राहिलेल्या गोष्टी पहाण्यासाठी प्रवासावरचे निर्बंध थोडेफार शिथिल झाल्यावर त्वरीत ह्या ठिकाणांना भेट देण्यापासुन स्वतःला रोखू शकलो नाही.
COVID-19 मुळे लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध स्थानिक परिस्थिती नुसार काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात कायम असल्यामुळे तर
मिसळपाव
(दिवार बेटावर एक तळे)
निवास आणि भोजन
दौऱ्यात काही ठिकाणी निवासाची सोय मोठ्या हॉटेलमधे होती त्यामुळे ते जसे असायला हवे होते तसे होते. दिवार बेटावर आम्ही Mercure Devaaya Retreat या रिसॉर्टवर राहिलो होतो.