Skip to main content

एक विषय- तीन लेख

लेखक रन्गराव यांनी शनिवार, 13/11/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता चौथी- विषय-" एक प्रवास" दोन आठवड्यांपूर्वी आईबरोबर मामाच्या गावी जाऊन आलो. प्रवासाला जायच म्हणून कधी नव्हे ते भल्यापहाटे उठलो. नाष्टा आवरून घरातून बाहेर पडलो. रिक्षातून जावूया असा हट्ट धरला तरीही बर स्थानक फार लांब नाही अशी समजूत घालून आईने एक मैलभर चालवल. एवढ चालून स्थानकावर पोहोचलो परत भूक लागली. पायही दुखायला लागले होते. पण सगळी नुसता धुरळा होता किंवा लोकांनी पान खावून थुंकल्यामुळे काही जागा रंगल्या होत्या. बसायला धड जागा मिळाली नाही. ताटकळत उभा रहाव लागलं. नेहमीप्रमाणे बस उशीरा येणार होती. तोपर्यंत एक मुलगा चॉकलेट विकायला आला.

ही कला की विकृती?

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 13/11/2010 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
dpreview.com या छायाचित्रणाला वाहिलेल्या पोर्टलवर नियमित पणे वेगवेगळ्या विषयावरील छायाचित्रे चॅलेन्ज म्हणुन आमंत्रित केली जातात. मला सध्या जाहिर केलेला 'खाटिक' हा विषय जरा विचित्र वाटला. क्रौर्य कलाकृतीचा अनेक वेळा विषय बनले आहे. पण खाटिक विषयावर अनेकानी पाठवलेली छायाचित्रे कलाकृती वाटली नाहीत. http://www.dpreview.com/challenges/ChallengeSlideshow.aspx?ID=3599&Entr…

शिक्षक-विद्यार्थी

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 13/11/2010 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षक-विद्यार्थी नाते कसे असावे या विशयावर एक लेख वाचला होता . तो पुर्न न देता फक्त सार देत आहे. का ? विचाराल तर माहित नाही . सहजच... शिक्षक-विद्यार्थी मधे इतकेच अंतर असावे जितके शेकोटी आणि ऊब शेकनार्‍या मधे असते , म्हनजे जास्त जवळ गेल्यास जळन्याचा धोका व जास्त लाम्ब गेल्यास ऊब( ग्यानरुपी ) न मिळ्न्याचा धोका.

चष्मेभाद्दर

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 13/11/2010 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
चष्मेभाद्दर व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणेच चष्म्याचेही किती प्रकार! फ़्रेमच्या आणि भिंगांच्या नाना तऱ्हा. फ़्रेम मधे पुरूषी आणि बायकी अशा दोन लायनी. शिवाय आजकाल युनीसेक्स ही तिसरी. कुणाच्या दांड्या काळ्या कुळकुळकुळीत, कुठे धुसर राखाडी, कधी अंगावर येणाऱ्या लाल भडक, पाचुसारख्या हिरव्या, वेगळेपणा जपणाऱ्या पांढऱ्या, तर कधी श्रीमंती मिरवणाऱ्या सोनेरी. एकाच रंगाचा कंटाळा आला म्हणून कुणी रेषा रेषांची नक्षी पांघरलेल्या. कुणाच्या काड्या मालकाप्रमाणेच गलेलठ्ठ. कुणाच्या हडकुळ्या. भिंगाचे सुद्धा अनंत प्रकार.

निषेध्,निषेध!

लेखक pramanik यांनी शनिवार, 13/11/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज मुंबईला आलो,घरी वीजेचे बील आले होते.रक्कम वाचुन संताप झाला,४८५० रु.,गेल्या महीन्यात हेच बील २९०२ रु.

अजब आहे ना ?

लेखक विनोद कोकने यांनी शनिवार, 13/11/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात ..... ३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........ पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते..... पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही .......... पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ...... Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो.............. पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत./..... असे लेख लिहायला खूप अवघड वाटते .........

(भांडणं..तिचं)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली - लांबलेली सांज, कातरवेळ... मनात तीच.. तशीच नेहमीसारखी ! तेच जीवघेणं मौन , तीच नजर करारी. त्या नजरेची दहशत, ते गर्भगळीत होणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... लवकर कल्टी मारण्यासाठी. मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं मी फिक्सर, ती हिटलर .... सार्‍या संध्येचा विसर ! बागेतलं भटकणं, पावसातलं भिजणं, बारमधलं रमणं, शर्टावरल्या गुलाबी खुणा.... ... .. अन् अचानक... अचानक तिचं प्रकटणं .. मग तिचं अस्तित्व, खरं, वास्तवातलं कानफटातलं, बुक्क्यांतलं ! त
काव्यरस

चांदणं... तुझं

लेखक जयवी यांनी शनिवार, 13/11/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
थांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा ! तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... भेटण्यासाठी. मग कबूली, ते उमजणं, समजून घेणं तो बहर, तो मोहर.... सार्याल जगाचा विसर ! पावसातलं भटकणं, चांदण्यातलं भिजणं, कवितेतलं रमणं, डायरीतल्या गुलाबाच्या पाकळ्या.... ... .. अन्‌ अचानक... अचानक तुझं हरवणं .. मग तुझं अस्तित्व फक्त फ़ोटोतलं, आठवणीतलं, स्पर्शातलं ! तो पाऊस, ते चांदणं, त्या कविता….पाकळ्या, सारं काही पोरकं, तुझ्याशिवाय ! आता सांज डोळ्यात, रात्रीच्या प्रतिक्षेत आणि रात्र.... रात्र तुझ्या चांदण्यात ! जयश्री अंबासकर
काव्यरस

(((निशाण)))

लेखक अवलिया यांनी शनिवार, 13/11/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे
नसे भाट ना मी द्वेष्टा केवळ भक्त व्यासमुनींचा ज्याने लिहिली समग्रगाथा स्वजन्मरहस्य नोंदले आहे ( नकोत चर्चा व्यास कोण तो तोच का ज्याने संपादले वेद की कुणी अन्यकृत लेखन व्यासशिरी खोविले आहे)
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे
वेदवचने वा उपनिषदे असो मार्गदर्शक सदैव आहे कुणी उल्लंघता स्वैरपणे दोष कसा त्या ग्रंथास लागे?
पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक