ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद
काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो.
मिसळपाव