Skip to main content

अंगाई

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - -
काव्यरस

मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का? दोन-तीन महिन्यांपुर्वी मी नविन घरी शिफ्ट झालो आणी घरी छोटेखानी बार असण्याचे स्वप्न सकार केले. बार मधे बर्याच प्रकारच्या Liquors (रम, व्हिस्की, स्कॉच इत्यादी) ठेवणे एक्दम सोपे आहे. पण Liqueurs मिळवणे थोडे कठीण आहे असे मला वाटते.

तो कवी..ती कवियित्री..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 09/12/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो कवी..ती कवियित्री.. ------------------------------------- तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री.. हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..
काव्यरस

पोटपुजेची ठिकाणे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 09/12/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन .. त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते. परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे .. असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते. ------------------------------------- मिसळ : १. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची .. २.

अळूवडी

लेखक जागु यांनी गुरुवार, 09/12/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: ८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन) बेसन २ वाट्या अर्धा वाटी तांदळाचे पिठ चिंचेचा कोळ गुळ मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या) मिठ आल लसुण पेस्ट कांदा चिरुन भाजुन सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन १ चमचा तिळ अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला तळ्यासाठी तेल पाककृती: अशी ताजी ताजी अळूची पाने घ्या. पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा हे देठ सुरीने थोड

चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

लेखक रोमना यांनी गुरुवार, 09/12/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल. मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो.

मराठी मुद्दा ....

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 09/12/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणुस यावरुन बरेच वादळ अधुन मधुन उठत असते. ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मराठी असा संदर्भ असलेला मुद्दा पुढे येतो तेव्हा तथाकथित विचारवंत त्याला नाके मुरडत हा जागतिकीकरणाविरोधी मुद्दा आहे, अशा प्रकारे कुणीही वागु नये इत्यादी मुद्दे उपस्थित करुन मराठी विरोधात मते मांडत असतात. ब्रिटिश भारतात (विशेषतः महाराष्ट्रात ) येण्यापूर्वी इथे (महाराष्ट्र आणि भारतातला बराचसा भुभाग) हिंदू धर्मियांचे राज्य होते. त्याचे कारण महाप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच होय याबद्दल तरी कुणाच्या मनात शंका नसावी. ज्यांच्या मनात काही शंका असेल त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा.