Skip to main content

सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 21/12/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा! कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्‍याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे!

अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत

लेखक गांधीवादी यांनी मंगळवार, 21/12/2010 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.

यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 21/12/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात. उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे. यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे. सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद!

निदान फुकट तरी द्या..

लेखक गवि यांनी मंगळवार, 21/12/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार म्हणजे मोक्षवार. सकाळी उठून आलेयुक्त चहासोबत दोन दोन लठ्ठ पेपर समोर दिसले की ब्रम्हानंद होतो हे पेपरप्रेमींना सांगणे नलगे.
आम्ही टायगर कडक पत्ती चहा (वाघासारख्या मर्दांसाठी..) वापरत नाही तरीही चहाचा पहिला घोट कडू होतो तो पेपर बघून.
नाय नाय..
"पेपरात बघावं तर काय? रोजचे खून, राजकारण, बलात्कार, बाई बाई गं..नको वाटतं अगदी"
..असले लेख खूप जुने झाले.
तसलं काही ल्हिवायचा विचार नाही.

बिडी

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 21/12/2010 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी काहि नाही.. जरा बिडी वढायची म्हंतो... कोन्ती बिडी चांगली अस्ती झुरका मारायला? जरा सांगता का?

उपमा

लेखक शरद यांनी मंगळवार, 21/12/2010 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
उपमा शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक : [१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई. [२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....

फ्रोह वाईनाख्टन!!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 21/12/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख - या आधी- नाताळची चाहूल! पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात.

आहेर, भेटवस्तू आणि संकट

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 21/12/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्रसंगानुरुप किंवा प्रसंगाशिवाय भेटवस्तू देणं किंवा स्वीकारणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे; इतकं अंगवळणी पडलं आहे की वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, त्या वस्तूची किंमत किती आहे वगैरे बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात. आता हेच बघा ना, लग्नातला आहेर किती गमतीदार असतो. अगदी जवळच्या नात्यातलं लग्न नसेल तर आहेर विकत घेतला जात नाही; तो घरातच जुळवला जातो.

मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके आणि एलवण्याची कढी

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/12/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात. खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्‍याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात. खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात.