Skip to main content

नाताळचा फराळ!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 24/12/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी- नाताळची चाहूल! फ्रोह वाइनाख्टन! आपल्याकडे दिवाळीच्या आधी एखादा आठवडा घराघरातून लाडवासाठी बेसन भाजल्याचे, चकली, कडबोळ्यांच्या तळणीचे, चिवड्याच्या खमंग फोडण्यांचे वास यायला लागतात आणि 'दिवाळी जवळ आली' ही वार्ता त्या दरवळाबरोबर पसरते. जर्मनीमध्ये नाताळासाठी असा फराळ करायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे नाताळफराळ म्हणून केली जातात. त्यातल्याच काही पाककृती- १) बुटरप्लेटझन- लोणीयुक्त बिस्किटे. आमच्या आकिमआजोबांच्या आईची ही कृती.

माझे छळवादी.

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 24/12/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात (किंवा काम नसल्यास मिपात) एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बर्‍यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो.

पोळीचे लाडू (चुरमा)

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 24/12/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः आदले दिवशीच्या उरलेल्या पोळ्या :-)(किंवा सकाळी केलेल्या पोळ्यांची संध्याकाळी ही पाककृती होऊ शकेल.), चिरलेला गूळ, तूप, वेलची पूड क्रुति: एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा. त्याचे ४ भाग करून १ भागाएवढा गूळ १ बाउलमध्ये घ्यावा. कढईत थोडे तूप घेऊन ती मंद गॅसवर तापत ठेवा. (तूपाचे प्रमाण आपापल्या अंदाजाने घाला. २-३ प्रयोगानंतर अंदाज येईल.) त्यात चिरलेला गूळ घालून हलवत रहा. चवीपुरती वेलची पूड घाला. गूळ छान पातळ झाला की लगेच त्यात पोळीचा चुरा घाला. गॅस बंद करा. आणि मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे लाडू वळा.

आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेले संस्थळ : मिपा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 24/12/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अवांतर लिखाण बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना मिपा स्वगृहात वाचण्यासाठी लेखन, पाककृती विभाग द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश पशा टुकारे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना(७ महिन्यांनी) अखेर मिपाच्या दहशतवादविरोधी पथकाने काटाकिर्र येथून अटक केली. पुढे मिपाबाहेर प्रतिबंधीत कोठडीत असताना ह्या अतिरेक्यांनी हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या.

[ज्योतिष] ४ जानेवारी २०११ चे सूर्यग्रहण कुणाला शुभ ठरेल?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 24/12/2010 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जानेवारी २०११ रोजी होणारे काही व्यक्तीना भाग्यदायी ठरायची शक्यता आहे. यापैकी ज्यांना ते विशेष भाग्यदायी ठरेल त्यांच्या जन्मतारखा पुढे देत आहे.

यमक

लेखक शरद यांनी शुक्रवार, 24/12/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
यमक आज एका शब्दालंकाराची माहिती घेऊ,(मिसळपाव काही शाळा नाही की जेथे उपमे नंतर उत्प्रेक्षा यावयालाच पाहिजे.) खरे म्हणजे यमक हा अनिर्वार्य अलंकार नाही. संस्कृतमध्ये तर नाहीच नाही, पण मराठीत मात्र तो पहिल्यापासून लोकप्रिय [की कवीप्रिय म्हणू ? ] आहे, अट्टाहासाने निर्यमकी कवितेला सुरवात करे पर्यंत यमक नाही म्हणजे कवीची शब्दसंपत्ती अथवा प्रतिभा कमी दर्जाची आहे अशीच समजूत होत असे.

मदत हवी आहे - पुण्यनगरी - स. पे. मध्ये रहाण्याची सोय.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/12/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी १६ जनेवारी ते २४ जानेवारी दरम्यान पुण्यात सदाशिव पेठेतील चाणक्य मंडलच्या अभ्यास महोत्सवासाठी येणार आहे. या १० दिवसांसाठी राहण्याची सोय कुठे होऊ शकेल याची माहिती देण्याची नम्र विनंती मिपाकरांना करतो. माझ्या अपेक्षा: १. रुम अन्य एक दोन व्यक्तीं सोबत शेअर करण्याची तयारी आहे, मात्र डॉर्मेटरी नसावी. २. अंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता असावी. ३. शक्यतो सदाशिव पेठेतच हे ठिकाण असावे, मात्र ऑटोने किफायतशीररित्या जाता येईल इतपत दूर असल्यास चालेल. आणि सर्वात महत्त्वाचे: ४.

साहित्य संमेलन का उधळवता ?

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे.

प्रार्थना ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/12/2010 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनेचे सूर येतात दूरवरून लांबून ..पहाडातून किती नि कसे छान वाटते हिरव्या माळरानावरून तरंगत येतात ते दैवी सूर मन कसे शांत नि शांत होते बघा एकदा अनुभवून पाखरांचा स्वर त्यांचा वावर झाडाचे असणे फुलणे निळ्या निळ्या डोंगरावरून येणारी झुळूक ही सगळीच प्रार्थनेची टिंबे,उदगारचिन्हे ,वेलांट्या नि मात्रा नि कडवी मन जाते हरवून बघा एकदा अनुभवून हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप ती शांत नागमोडी नदी पाखरांचे आवाज फुलपाखरांचे फुलाभोवती गिरकत राहणे हेपण असतात प्रार्थनेचे सूर बघा एकदा अनुभवून देवाजवळचा दिवा समयी ..निरांजन त्याचा मंद प्रकाश किती पवित्र वाटतो घ्या मन
काव्यरस