Skip to main content

मिपाकरांच्या त्रासदायक सवयी

लेखक गोगोल यांनी शनिवार, 25/12/2010 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
वा रे वा फक्त नवरा बायकोंच्याच सवयी त्रासदायक नसतात. मिपा करांच्या देखील काही त्रासदायक सवयी असतात. त्यापैकी टॉप १० (तुम्हाला मराठी काळात नसल तर इंग्लीश मधून मुख्य १०). १. चांगले चांगले लेख क्रमश: मध्येच दाबून ठेवणे. ज्यामुळे मिपा आलतु फालतू लेखांच्या भडिमारामुळे वाचनास निरुपयोगी होऊन बसते. २. आपले लेख किंवा प्रतिसाद अंगाशी यायला लागल्यावर (त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ न राहता) उडवून लावणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेतो. ३. एकोळी धागे - निदान तुमच्या मताची तरी गरज असते. फक्त लिंक देऊन चालत नाही. ४.

डॉ. बिनायक सेन

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 24/12/2010 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
छत्तिसगडमधील एक प्रमुख कार्यकर्ते, आदिवासींसाठी आरोग्यसेवांबाबत काम करणारे, आंतरराष्ट्रिय स्तरावर ज्यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे असे डॉ. बिनायक सेन यांना आज रायपुर जिल्हा न्यायालयाने माओवाद्यांना मदत केल्याच्या आणि त्यामुळेच देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाबाबत सध्या बरीच भवतीनभवती चालू आहे. डॉ. सेन यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू जोरदारपणे उचलून धरली आहे. जालावर जे काही थोडेसे संदर्भ मिळत आहे त्यावरून तरी डॉ. सेन यांच्यावरचा गुन्हा अगदी निर्विवादपणे शाबित होत आहे असे वाटत नाहीये.

नवर्‍यांच्या त्रासदायक सवयी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/12/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्‍याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०). (१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. (२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते.

मदत हवी आहे- बगीच्या संबंधी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/12/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
बगीच्यात अनेक झाडे आहेत. त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात. अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत. पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात, आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात. जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

सावध व्हावे हे जनताजन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 24/12/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
सावध व्हावे हे जनताजन मळभटं सारी द्यावी झटकून सावध व्हावे हे जनताजन ....॥१॥ कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ आग लागुनी जळता तरूवर म्हणती आहे मम घर दूरवर सोकाविती मग कोल्हे-दांडगे आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥ किमान थोडा लगाम खेचा नांगी धरुनी त्यांची ठेचा झोपेचे हे सोंग फ़ेकूनी अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥ गंगाधर मुटे .................................................
काव्यरस

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

अंतर्धान अस्तित्व माझे ...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 24/12/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द

दोन पेग मारुन.................

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 24/12/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
मानुस च बनला माणसाचा वैरी .. तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................ अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ? खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ...................... एकलव्यान मानल द्रोणास गुरु ... दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा" आजचेच काही "गुरु" प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा" भूछत्र उगवतात तसे उगवले शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या .......... डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड पार करत सामान्य

सवय

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 24/12/2010 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.

मदत हवीय आहे !

लेखक धुमकेतू यांनी शुक्रवार, 24/12/2010 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या इमारती च्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती ! धन्यवाद !!!!