Skip to main content

फॅट फ्री मद्य

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 07/01/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच मद्य मुळात 'फॅट फ्री' असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी 'आहे काय न नाही काय' असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात? फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप 'unexclusive' विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत.

सायलेंटियम

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 07/01/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सायलेंटियम साल्झबर्ग या ऑस्ट्रीयातल्या छोट्याश्या गावात आत्महत्त्या करण्याची लाट आली आहे की काय असे वाटत असते. त्यातच गावातील प्रतिष्ठित अश्या समारोह अध्यक्षांच्या जावयाच्या आत्महत्त्येने गावात खळबळ माजते. हे अध्यक्ष साल्झबर्ग गावाचे नाव मोठे व्हावे म्हणून निरनिराळे समारोह आयोजित करण्याचे मनावर घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे कलाकार मिनतवारीने गावात बोलावले जातात. पण यावेळी ही आत्महत्त्या नसून खून आहे असा संशय तयार होतो. कारण या माणसाने चर्चच्या सध्या आर्चबिशप असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे जाहीर आरोप केलेले असतात.

असहाय्य

लेखक मराठे यांनी गुरुवार, 06/01/2011 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला त्यांनी दत्तक घेतलं होतं... नाही "पाळलं होतं" हा शब्दप्रयोग जास्त बरोबर आहे. मला जन्म देणारी आई मला आठवत नाही. पण माझी काही तक्रार नाही. हे नविन घर मला आवडलं होतं. बहुतेक सगळे माझ्याशी चांगले वागत होते. मला चांगलं खायला मिळत होतं, राहायला चांगलं ऐसपैस घर होतं. विशेष म्हणजे मी रात्री उशीरापर्यंत जागत राहिलो तरी मला कोणी बोलायचं नाही. तुम्हाला घरच्यांबद्धल सांगतो, प्रथम माझी आई.... सुशीला नाडकर्णी. आई माझे खूप लाड करायची. सुरवातीला मी तिला आई म्हणायला जरा घाबरत होतो, पण काही दिवस गेल्यावर मग सर्रास आई म्हणायला लागलो. पण मला वाटतं तिला त्यात काही वेगळेपण जाणवलंही नाही.

भारी पडली जात

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 06/01/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारी पडली जात पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात? नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात निकाल आला, करुनी माझ्या, परिश्रमास मातीमोल कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात भिती मन

प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 06/01/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई जैताच्या गावात ऊर्जेची उईउई रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा अडम तडम तडतड बाजा ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा एआरडॅनी जयहो राजा अडम तडम तडतड बाजा गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा शरद

श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाचे पत्ते

लेखक रोमना यांनी गुरुवार, 06/01/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या मी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांवर (आंतरजालावर उपलब्ध माहिती, तसेच इतर उपलब्ध माहिती वरुन) ब्लॉग बनवीत आहे. आणि त्यांत वेगवेगळ्या ठीकाणचे स्वामींच्या मठाचे पत्ते देण्याचा मी विचार करीत आहे. तरी कृपया आपल्याला माहित असलेल्या मठांचे पत्ते (जमल्यास संपुर्ण), मठाचा वेळ व त्या मठाशी निगडीत माहिती देण्याचा आपला विचार असल्यास आपले स्वागत आहे. यापाठी माझी एकच भावना आहे की जे प्रवासाच्या निमित्ताने विविध ठीकाणी भ्रमण करीत असतात आणि आपल्या आराध्य मुर्तीचे दर्शन घेऊ इच्छीतात त्यांना सुविधा व्हावी. सध्या ब्लॉग अपुर्ण अवस्थेत आहे.

'फेसबुक' वर आहेस का?

लेखक दैत्य यांनी गुरुवार, 06/01/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो... कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना.... सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...

भाकरी निर्मिती एक कला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 06/01/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे. तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं.